वाशिम शहरातील धार्मिक स्थळांची स्वच्छता करून स्वच्छता हीच सेवा मोहिममध्ये सहभाग.

 वाशिम शहरातील धार्मिक स्थळांची स्वच्छता करून स्वच्छता हीच सेवा मोहिममध्ये सहभाग.

------------------------------- 

रिसोड.प्रतिनिधी 

रणजीत सिंह ठाकुर 

------------------------------- 

*नेहरू युवा केंद्र वाशिम व नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळ केकतउमरा यांचा पुढाकार.

"*My Bharat - राष्ट्रीय पोर्टलवर कार्यक्रमाची केळी नोंद"


वाशिम : युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय भारत सरकार द्वारा मेरा युवा भारत - नेहरू युवा केंद्र वाशिम व नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळ केकतउमरा यांच्या संयुक्त विद्यमाने शहरामध्ये स्वच्छता ही सेवा या मोहिमेमध्ये सहभाग घेऊन वाशिम शहरातील धार्मिक स्थळांची व महापुरुष यांच्या पुतळ्यांची स्वच्छता करून मोठ्या उत्साहन या मोहिमेमध्ये सहभाग घेतला आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत - आगामी 'स्वच्छता ही सेवा' मोहिमेची थीम 'स्वभाव स्वच्छता- संस्कार स्वच्छता' आहे. स्वच्छ निवासी क्षेत्रे, सार्वजनिक जागा, जलकुंभ, बाजार, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, धार्मिक स्थळे यासह विविध क्षेत्रातील स्वच्छता वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या उद्देशाला अनुसरून

यामध्ये ओला कचरा - सुका कचरा प्लॅस्टिक निर्मूलन, जलस्वच्छता, मोक्षधाम स्वच्छता ,ऐतिहासिक बालाजी मंदिर, तसेच छत्रपती शिवाजी महाराज,आणि मोक्षधाम तलाव इत्यादी परिसराची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेमध्ये नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक व नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष व सदस्य यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन तब्बल तीन तास श्रमदानातून स्वच्छता केली आहे. या कार्यक्रमाचे छायाचित्र हे my Bharat - मेरा युवा भारत या राष्ट्रीय पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहे.

तर स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.रांगोळी स्पर्धा ,निबंध स्पर्धा, एक पेड मा के नाम, या सर्व विविध उपक्रम राबविले जात असल्याची माहिती  देण्यात आली.

या उपक्रमामध्ये जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त मा. राष्ट्रीय युवा कोण प्रदीप पट्टेबहादूर, नेहरू युवा केंद्र स्वयंसेवक दत्ता मोहोळे, सचिन भगत,स्वयंसेवीका वैष्णवी पानझडे, पुनम भगत, गायत्री खंदारे पूनम पडघण प्रियल सुर्वे,आकांशा कांबळे, स्वाती राठोड, पूनम गिरी, माधुरी गिरी, पल्लवी गोदमले,मयुरी काळे,  यांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रम हा नेहरू युवा केंद्र जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत व  लेखा अधिकारी अनिल ढेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.