राधानगरी येथील घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेत नितीन काळेबेरे प्रथम.
राधानगरी येथील घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेत नितीन काळेबेरे प्रथम.
---------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
---------------------------------
राधानगरी येथे कै. रेवताबाई दत्तात्रय एकावडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गणेश चतुर्थी निमित्त घेण्यात आलेल्या घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस नितीन काळेबेरे यांनी पटकावले. ट्रस्टच्या वतीने सौभाग्य अलंकार चे मालक, सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद एकावडे यांनी ही स्पर्धा 20 वर्षे आयोजित करत आहे. या स्पर्धेमध्ये जुन्या पारंपारिक व टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू, किल्ले संवर्धन, बालहत्या, राधानगरी विकास, पंढरपूरची वारी, स्त्री अत्याचार, ज्योतिबा पालखी, झाडे लावा झाडे जगवा, आकर्षक सजावट, गौरी गणपती सजावट असे निकष होते.
स्पर्धेचा निकाल असा :-
प्रथम क्रमांक- नितीन काळेबेरे (राधानगरी),
द्वितीय क्रमांक विभागून - शुभम साळवी (कासारवाडी). अपूर्वा / हविश तिरवडे (राधानगरी) , तृतीय क्रमांक विभागन - श्रीकांत तुरंबेकर (फेजीवडे). भाग्यश्री चव्हाण (शेटकेवाडी) , चतुर्थ क्रमांक विभागून- प्रशांत चौगुले (कुडूत्री). वैभव चौगुले ( कुडूत्री) , पाचवा क्रमांक विभागून - सुप्रिया हुजरे(गुडाळवाडी).. अमर चौगुले (कुडूत्री) , उत्तेजनार्थ - ओंकार चौगुले, विनोद पाटील, अभिजीत तोरस्कर, गुरुप्रसाद पो.
विजेत्यांना अनुक्रमे शिल्ड ,फेटा ,प्रमाणपत्र, बुके ,शाल मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार असल्याची माहिती एकावडे यांनी केले., या स्पर्धेमध्ये एकूण 30 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे परीक्षण पत्रकार-सुभाष चौगुले (कुडुत्री) , प्रसाद एकावडे (राधानगरी) , विश्वास आरडे (कुडुत्री) यांनी केले..
Comments
Post a Comment