रस्ता करण्यासाठी २ कोटी २६ लाख तर सामाजिक सभागृह बांधण्यासाठी १० लाख मंजूर-आ.विनय कोरे.
रस्ता करण्यासाठी २ कोटी २६ लाख तर सामाजिक सभागृह बांधण्यासाठी १० लाख मंजूर-आ.विनय कोरे.
------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------
म्हाळसवडे येथील मौजे चौथा मैल ते म्हाळसवडे दलितवस्ती पर्यंत खडीकरण - डांबरीकरण रस्ता करण्यासाठी २ कोटी २६ लाख तर सामाजिक सभागृह बांधण्यासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
तसेच काळू कांबळे,सर्जेराव कांबळे,गौतम कांबळे,अशोक कांबळे,दिपक कांबळे,मारुती कांबळे,प्रकाश कांबळे,राजू कांबळे,वसंत कांबळे,सुरेश कांबळे,दादासाहेब कांबळे,नामदेव बुरबाळकर,पांडुरंग कांबळे,नामदेव कांबळे यांच्यासह महाळसवडे गावातील शिवसेना गटातील कार्यकर्त्यांनी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला.
*यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरीडकर),युवराज बाबा काटकर,दिनेश पडवळ,हरिश्चंद्र पाटील,तुकाराम पाटील,एच.एस.पाटील (सर),विलास पाटील,चंद्रकांत तडावळेकर,अशोक टक्केकर - अध्यक्ष,मारुती पाटील,कृष्णा पाटील,शिवाजी पाटील,प्रकाश पाटील,सुरेश पाटील,नामदेव पाटील,दादू पाटील,कोडिंबा पाटील,गणेश पाटील,तातोबा पाटील,दगडू बांद्रे,ज्ञानदेन पाटील,बबन पाटील,विजय पाटील,बंडू पाटील,महिपती पाटील,संदिप गुरव आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.*
Comments
Post a Comment