Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

व्हिलेज लाईफ फाउंडेशन मार्फत सोनुर्ली शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप.

 व्हिलेज लाईफ फाउंडेशन मार्फत सोनुर्ली शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप.         

-----------------------------------

  गारगोटी प्रतिनिधी  

 स्वरुपा खतकर         

------------------------------------

      'गाव समृद्ध तर देश समृद्ध' या उद्देशाने सागर शिंदे यांच्या व्हिलेज लाईफ फाउंडेशन या संस्थेमार्फत सोनुर्ली व मेघोली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना व गुरुप्रसाद माध्यमिक विद्यालय सोनुर्ली शाळेतील मुलांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच धोंडीबा कांबळे होते. शैक्षणिक साहित्याचे वाटप भुदरगड चे गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना सागर शिंदे म्हणाले, पडखंबे हे माझे मूळ गाव असून २००२ मध्ये घरची परिस्थिती बेताची असल्याने नोकरीसाठी मुंबईला गेलो. तेथे पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना २०१८ मध्ये या सेवा संस्थेची स्थापना केली. गावाकडची ओढ असल्याने निस्वार्थी भावनेने ग्रामीण भागातील मुलांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करीत असल्याचे सांगितले. गावातील राजकारणी लोकांनी सुद्धा एखाद्या संस्थेच्या निवडणुकीवर लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा अशा विधायक उपक्रमावर तेच पैसे खर्च करावेत असे आवाहन केले. गटशिक्षणाधिकारी मेंगणे साहेब म्हणाले दातृत्वाची भावना जोपासणारी सागर शिंदे यांचे हे कार्य प्रेरणादायी असून आत्तापर्यंत त्यांनी भुदरगड मधील शेकडो मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केल्याबद्दल धन्यवाद दिले.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज पाटील यांनी सर्व ग्रामस्थ व शाळेच्या वतीने सागर शिंदे यांचे या उपक्रमाबद्दल विशेष कौतुक केले. यावेळी मुलांना मोठ्या वह्या, कंपास पेटी,पेस्टल कलर,फुट पट्टी, फोल्डर,पेन इत्यादी शैक्षणिक साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विश्वस्त राजश्री शिंदे, माजी सरपंच पंढरीनाथ महाडिक, माजी सरपंच राजाराम काटकर, शिवाजी काटकर, उपसरपंच सुधा पाटील, कविता काटकर, मुख्याध्यापक प्रकाश यादव, रमेश नांदुलकर, मोहिते ,राणे , रविंद्र खेतल,नारायण पाटील, लक्ष्मण गुरव, बाबू काटकर, किरण काटकर, ग्रामस्थ, महिला, शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. पांडुरंग गुरव यांनी अल्पोपहारची व्यवस्था केली. गणेश कोदले सर  यांनी आभार मानले.


चौकाट -  सागर शिंदे यांच्या व्हिलेज लाईफ फाउंडेशन ही संस्था दर वर्षी ग्रामीण भागातील  जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करते  यामुळे सागर शिंदे जरी मुंबईत असेल तरी त्यांनी ग्रामीण भागाशी जुळलेली नाळ अद्याप कायम राखली आहे. या उपक्रमामुळे त्यांचे पालक वर्गातून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments