कुंभोज हिंगणगाव परिसरातील खाजगी सावकारकित सर्वसामान्यांचा जातोय बळी?
कुंभोज हिंगणगाव परिसरातील खाजगी सावकारकित सर्वसामान्यांचा जातोय बळी?
-----------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
-----------------------------------
कुंभोज सह परिसरात असणाऱ्या हिंगणगाव ,नेज ,बाहुबली, दुर्गेवाडी नरंदे परिसरात सध्या खाजगी सावकार किने जोर धरला आहे. परिणामी अडले नडलेले शेतकरी सर्वसामान्य माणूस अडीअडचणी मिटवण्यासाठी बँका व पतसंस्थांना कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी लागणारा वेळ पाहता सर्वसामान्य शेतकरी वर्ग व सर्वसामान्य माणसांनी सध्या खाजगी सावकारांचा साहरा घेतला असून हिंगणगाव, कुंभोज, कवठेसार परिसरात असणारे खाजगी सावकार सध्या वेगवेगळ्या कारणाने सर्वसामान्य जनतेला व्याजाने पैसे पुरवत असून त्याच्या मोबदल्यात त्यांची जमीन घर व अन्य गोष्टीवर ताबा करण्यासाठी खाजगी सावकार पुढे सरसावले आहेत.
परिणामी खाजगी सावकार किला कंटाळून अनेक नागरिकांनी आपली गावे सोडली असून ,अनेक युवकांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला आहे. परिणामी शासनाने खाजगी सावकार किवर बंदी आणली असताना हजाराच्या बदल्यात लाखोंची वसूली करणाऱ्या या खाजगी सावकारांच्या वर कारवाई करण्यास शासन असमर्थ का ठरत आहे? परिणामी याच सावकारांच्याकडून कर्जांनी पैसे घेणारे सर्वसामान्य नागरिक मात्र दाम तिप्पट रक्कम देऊन ही मूग गिळून गप्प का? हा न्याय किती दिवस सहन होणार? याची चर्चा सध्या हिंगणगाव,कुंभोज परिसरात जोर धरत असून खाजगी सावकार की साठी पैसा पुरवणाऱ्या कुंभोज बाहुबली कवठेसार व परिसरातील अनेक गावातील नागरिकांची सध्या परिसरात चर्चा असून खाजगी सावकारकीचा विळखा अत्यंत घट होत चालल्याचे सध्या चित्र दिसत आहे. परिणामी खाजगी सावकारकिने केवळ दाम दुप्पट रकमेवरच नव्हे तर काही ठिकाणी शेत जमिनी घरे ताब्यात घेतल्याचेही चित्र दिसत आहे. खाजगी सावकार या लोकांना सहाय्य करणारे नेमके कोण आहेत, याची चर्चा सध्या परिसरात जोर धरत असून खाजगी सावकारकीच्या तागाद्याला कंटाळून होणाया आत्महत्या कुठेतरी थांबवणे गरजेचे आहे?
Comments
Post a Comment