कुंभोज परिसरात गणरायाचे उत्साहात आगमन,गणरायाच्या स्वागतासाठी पारंपारिक वाद्याचा वापर.

 कुंभोज परिसरात गणरायाचे उत्साहात आगमन,गणरायाच्या स्वागतासाठी पारंपारिक वाद्याचा वापर.

 ------------------------------ 

कुंभोज प्रतिनिधी 

विनोद शिंगे

------------------------------ 

कुंभोज सह परिसरात घरगुती व सार्वजनिक गणरायाचे उत्साहात आगमन झाले .सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी चालू वर्षी पारंपारिक लेझीम ढोल यासारख्या वाद्याच्या गजरात फटाक्याची आतशबाजी  करत मिरवणुकीने श्री गणरायाची प्रतिष्ठापना केली . लाऊड स्पीकरवरील श्री गणरायाची गाणी व सवाद्य मिरवणुकांमुळे सर्वत्र गणेशमय वातावरण झाले होते . 

       कुंभोज येथील अजिंक्य क्रीडा मंडळ,अदित्य मंडळ,अमर मंडळ,कुंभेश्वर तरुण मंडळ,सात मित्राची तरुण मंडळ, सुर्योदय तरुण मंडळ, राष्ट्रप्रेम तरुण मंडळ, विक्रमसिंह तरुण मंडळ, देशप्रेमी,एक गाव एक गणपती दुर्गेवाडी,अहिल्या,अंकुश,धर्मवीर संभाजीराजे तरुण मंडळ, अष्टविनायक , क्रांती तरुण मंडळ, विडिभाग तालीम मंडळ, गणेश मंडळ ,शिवप्रेमी गणेश मंडळ,बिरोबा गणेश मंडळ, या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पारंपारिक वाद्याच्या गजरात श्री गणरायाचे उत्साहात स्वागत केले .घरगुती गणपतीचे ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केले .काही गणेशोत्सव मंडळांनी गणेश चतुर्थीच्या अगोदर एक दोन दिवस श्री गणरायाचे सवाद्य मिरवणुकीने स्वागत करून प्रतिष्ठापना केली आहे . पावसाने उसंत दिल्यामुळे गणेश भक्तांचा आनंद व ओसंडून वाहत होता .

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.