सांगली विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत प्राथमिक चर्चेत एक मत.

 सांगली विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत प्राथमिक चर्चेत एक मत.

-----------------------------------

मिरज तालुका प्रतिनिधी 

राजू कदम 

-----------------------------------

शासकीय गेस्ट हाऊस सांगली येथील सांगली विधानसभा मतदारसंघातील काही ठराविक सामाजिक व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची मीटिंग संपन्न झाली. 

सदर मीटिंगमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून सांगली विधानसभा मतदारसंघाचा राज्यातील इतर विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत विकास कामाच्या बाबत व अन्य कामाच्या बाबत मागासलेला दिसत आहेत.

वेगवेगळ्या माध्यमातून आक्रमक नेतृत्व असेल सर्वव्यापी बहुआयामी नेतृत्व असेल याची उणीव कायम आपल्या मतदारसंघाला भासत आहे. 

सध्या निवडणुकीच्या तोंडावर वेगवेगळ्या प्रश्नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न प्रत्येक इच्छुक उमेदवार करताना दिसत आहेत. 

मात्र हेच इच्छुक उमेदवार इतर वेळेला आपापल्या कामात 

 असतात ते रस्त्यावरच्या लढाईला व आक्रमकपणाने  पुढे यायला तयार नसतात कारण त्यांना कोणाचा वाईटपणा घ्यायचा नसतो असो हा त्यांचा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. 

मात्र आपण चळवळतील कार्यकर्ते पक्ष बाजूला ठेवून आपल्या शहराच्या व मतदार संघाच्या विकासासाठी कायम शहरातील विविध प्रश्नांवर विषयांच्यावर आवाज उठवून संघर्ष करून काम करत असतो. 

मग कोणाच्यातरी मागे जाण्यापेक्षा आपल्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकत्र बसून सांगली विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवावी का यावर मोठ्या प्रमाणात चर्चा करण्यात आली. 

त्या चर्चेतून निघालेला सर असा आहे की आपण चांगले विधानसभा निवडणूक शंभर टक्के लढवायचीच असे एकमताने ठरले आहे थोड्याच दिवसात समविचारी सामाजिक कार्यकर्ते चळवळीतील कार्यकर्ते याची व सर्व सामाजिक घटकांची मग त्या असोसिएशन्स असतील संघटना असतील त्यांना सोबत घेऊन व्यापक बैठक वजा मेळावा घेण्यात येणार आहे पुढील भूमिका लवकरच जाहीर करू 

यावेळी पद्माकर जगदाळे सर दिलीप पाटील माजी नगरसेवक हनुमंत पवार नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर उमेश देशमुख समस्त मुस्लिम समाजाचे नेते असे बावा मराठा सेवा संघाचे नितीन चव्हाण रोहित शेख मुनीर मुल्ला उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.