सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशचे १४ वे त्रैवार्षिक अधिवेशन शिर्डी येथे संपन्न.
सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशचे १४ वे त्रैवार्षिक अधिवेशन शिर्डी येथे संपन्न.
------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------
सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशचे १४ वे त्रैवार्षिक अधिवेशन शिर्डी येथे संपन्न झाले. यावेळी सहकार भारतीच्या २०२४ ते २०२७ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी प्रदेश कार्यकारणीची घोषणा करण्यात आली. यामध्ये प्रदेश अध्यक्षपदी श्री. दत्ताराम चाळके आणि प्रदेश महामंत्रीपदी श्री. विवेक जुगादे यांची बिनविरोध निवड झाली. या नंतर प्रदेश स्तरावरील विविध नियुक्त्यांची घोषणा करण्यात आल्या. यात *सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश महिला प्रमुखपदी महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशनच्या उपाध्यक्षा सौ. वैशालीताई आवाडे यांच्या निवडीची घोषणा प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांनी केली.
यावेळी सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदय जोशी, राष्ट्रीय संगठन मंत्री संजय पाचपोर, भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, माजी प्रदेश अध्यक्षा शशीताई अहिरे, संघटन प्रमुख संजय परमणे, महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रम्हेचा, टीजेएसबी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल, सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेशराव गाडगीळ, जनता सहकारी बँक पुणे चे अभय माटे, सहकार सुगंधचे भालचंद्र कुलकर्णी यांच्यासह राज्यभरातून विविध जिल्हातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment