धुमडेवाडीत रंगला 'खेळ पैठणीचा सौ.नेहा पाटील ठरल्या पैठणीच्या मानकरी.

 धुमडेवाडीत रंगला 'खेळ पैठणीचा सौ.नेहा पाटील ठरल्या पैठणीच्या मानकरी.

------------------------------------

चंदगड प्रतिनिधी 

आशिष पाटील 

------------------------------------

धुमडेवाडी ( चंदगड ) : - गौरी गणपती उत्सवा निमित्त सामाजिक कार्यकर्ते संदिप पाटील यांनी आयोजित केलेल्या सन्मान नारीचा होम मिनिस्टर कार्यक्रम धुमडेवाडी येथे संपन्न झाला. प्रास्ताविक सौं. गंगा गोकाकर यांनी केले

यामध्ये खेळ पैठणीचा या खेळाला महिलांचा उर्त्स्फुत प्रतिसाद मिळाला.

सौ.नेहा गोविंद पाटील यानी मानाची पैठणी  पटकावली.श्री गणराया हे स्त्री शक्तीला मानाचे स्थान देणारे देवता आहे. महिला या बुद्धीमत्ता व कर्तृत्वाने कुठे ही कमी नसून त्याच्या पाठीशी सर्वांनी उभे राहून संधी देणे ही समाजिक जबाबदारी आहे.

श्री.संजय साबळे यांनी या कार्यक्रमात आपल्या अनोख्या शैलीने रंगत आणली. महिलांना विविध मनोरंजक प्रश्नोत्तरे, उखाणे, तळ्यात मळ्यात, झिम्मा फुगडी,संगीत खुर्ची यासारख्या खेळातून आनंदमय वातावरण तयार केले.

प्रत्येक खेळातील विजयी स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. यामध्ये स्नेहल पाटील, अस्मिता पाटील, शोभा पाटील,पूजा बागडी, विद्या पाटील, यमूना पाटील या महिलांनी यश मिळविले.

कार्यक्रमाला जाणबा पाटील, कृष्णा पाटील, यल्लाप्पा पाटील, शंकर पाटील तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. आभार विद्या पाटील यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.