कळंबा येथील डॉक्टर दाम्पत्याच्या घरांतील चोरीचा उलगडा
कळंबा येथील डॉक्टर दाम्पत्याच्या घरांतील चोरीचा उलगडा.
------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
------------------------------
डॉ.सौ. दिपाली सुभाष ताईगंडे, रा. आदिनाथ नगर, कळंबा रोड, कोल्हापूर यांचे राहत्या घरातून फेब्रुवारी २०२४ ते दिनांक ०४/०४/२०२४ रोजी दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने १५ तोळे ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची फिर्यादी करवीर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती
दाखल फिर्यादी नुसार गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गून्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी चालू केला. तपास पथकाने गुन्हा घडले ठिकाणी भेट देवून गुन्हा घडलेची पध्दत व फिर्यादी यांचे घरामध्ये काम करणारे कामगार यांची गोपनीय माहिती मिळवून तपास करीत असताना नमुद पथकातील पोलीस अंमलदार गजानन गुरव यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदरची चोरी फिर्यादी यांचे घरामध्ये कामास येणारा प्रसाद माने याने केली असून तो आज रोजी गुजरी कोल्हापूर येथे चोरीचे दागीने विक्री करिता घेऊन येणार आहे.मिळालेल्या माहिती नुसार सहा.पोलीस निरीक्षक मसुटगे व पोलीस पथक यांनी गुजरी कोल्हापूर येथे साध्या वेषात पाळत ठेवून प्रसाद रघुनाथ माने, वय २० वर्षे, रा. सुर्वे नगर, कळंबा, कोल्हापूर यास ताब्यात घेतले. त्याचेकडे अधिक चौकशी केली असता पहिल्यादा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेऊन तपास केला असता त्याने डॉ. दिपाली ताईगडे यांचे घरी चोरी केली असल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याचे कब्जातून चोरीचे १५ तोळे ०८ ग्रॅम वजनाचे ८,४५,० ० ०/- रूपये किंमतीचे सोन्याचे दागीने कायदेशिर कागदपत्राची पूर्तता करून जप्त केले. सदर आरोपीस जप्त केले मुद्देमालासह पुढील कारवाई करीता करवीर पोलीस ठाणे येथे हजर केले असुन पुढील तपास करवीर पोलीस ठाणे करत आहेत
Comments
Post a Comment