समनक जनता पार्टी तालुकाध्यक्ष पदी ऑड. विजयकुमार पवार यांची निवड.
-------------------------
लोहा, प्रतिनिधी
अंबादास पवार.
-----------------------------
सामाजिक समता न्याय तत्त्वावर आणि सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारा पुरोगामी विचारांचा पक्ष समनक जनता पार्टीची तालुकाध्यक्ष पदाची निवड नुकतीच पार पडली त्यात तालुकाध्यक्ष पदी विधीज्ञ विजयकुमार पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
शहरातील सोमसिंग नाईक आश्रम शाळेत नुकतीच निवड बैठक बैठक घेण्यात आली. याप्रसंगी समनक जनता पार्टीच्या तालुकाध्यक्ष पदी ऑड. विजयकुमार पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांच्या आदेशानुसार जिल्हा अध्यक्ष प्रा. निळू भाऊ पवार यांच्या हस्ते पवार यांना नियुक्ती पत्र प्रदान केले. बैठकीस गोरसेनेचे जिल्हाध्यक्ष अतुल राठोड, नांदेडचे शहराध्यक्ष दशरथ राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोर सेनेचे तालुकाध्यक्ष अरविंद राठोड, संपर्क प्रमुख आमोल नायक, गोर सेना तालुका संघटक गुणाजी चव्हाण, माधव राठोड, भाऊराव चव्हाण, शहराध्यक्ष गोविंद राठोड, विष्णू चव्हाण, गजानन जाधव, लहु पवार, राजू राठोड, प्रविण राठोड, बळिराम जाधव, आत्माराम जाधव, बंडु जाधव आदींसह बहुसंख्येने उपस्थिती होती.
0 Comments