आदिवासी युवक क्रांती दलाची जिल्हा कचेरीवर निदर्शने: धनगर समाजाला आरक्षण वरून आक्रमक, राज्यभरात निषेध.
आदिवासी युवक क्रांती दलाची जिल्हा कचेरीवर निदर्शने: धनगर समाजाला आरक्षण वरून आक्रमक, राज्यभरात निषेध.
--------------------------------------
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
पी.एन.देशमुख.
--------------------------------------
अमरावती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयाचा आदिवासी बांधवाकडून राज्यभर निषेध व्यक्त केला जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो आदिवासी आदिवासी बांधव आदिवासी युवा क्रांती दलाच्या नेतृत्वात जिल्हा कचेरीवर धडक दिली
यावेळी शासनाविरोधात निदर्शने करण्यात आली. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकार हालचाल करत आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः याबाबत त्यांच्या शिष्टमंडळाला आश्वस्त केल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचा आदिवासी युवा क्रांती दल संघटनेने जाहीर निषेध व्यक्त केला आहे
मुळात धनगर व धनगड हे दोन्ही शब्द अनुसूचीत जमातीच्या सुचित नाहीत. इंग्रजी शब्दाचे भाषांतर धनगड असे केले जात आहे
ओराॅन, धांगड,या जमातीशी धनगर जातीचा तीळ मात्र ही संबंध नाही. धनगर ही जात आहे; जमात नाही. तसेच संदर्भात असताना देखील चुकीच्या पद्धतीने धनगरांना अनुसूचित जमाती आरक्षण देण्याचे मागणी होत असताना या मागणीला मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिल्याने याच आदिवासी युवक क्रांती दलाच्या वतीने निषेध व्यक्त करा जिल्हा कचेरीवर निदर्शने करण्यात आली. धनगर समाजाला आदिवासी आरक्षण देण्याचा मुख्यमंत्र्याचा निर्णय हा आदिवासीच्या हक्कावर अतिक्रम असून तो निर्णय मागे घ्यावा, आदिवासी समाजातर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वेदनातून देण्यात आला. शिष्टमंडळात आदिवासी युवा क्रांती दलाचे अध्यक्ष रामेश्वर युनाते, पंकज व्हेरायटे, प्रशांत मडावी, वंदना कंगाले, विनोद मरस कोल्हे, रामेश्वर उईके, मोना आत्रम, सीमा मरकाम आदींचा सहभाग होता.
Comments
Post a Comment