रिसोड मधिल आधार कार्ड सेंटरची वाढ करा.
---------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर
----------------------------------
ग्रामीण व शहरी भागातील आधार कार्ड सेंटरची वाढ करा.
आधारकार्ड अपडेट साठी महिलेची उडत आहे तारांबळ.
*महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तहसिलदार यांना निवेदन*
रिसोड तालुक्यातील व शहरातील आधार कार्ड सेंटरची वाढ करण्याबाबत दि 5-9-2024 रोजी रिसोड तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.उपस्थित नायब तहसिलदार दराडे साहेब यांनी २ ते ३ दिवसाच्या आत बंद असलेले आधार कार्ड सेंटर चालु करण्याचे आश्वासन दिले.व नविन आधार कार्ड सेंटर चालु करण्याचे निवेदन जिल्हाधिकारी वाशिम यांना तात्काळ कार्यवाही करुन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावा असे निवेदनावरती लिहुन दिले.सद्या लाडकी बहिण योजनेचा जोर असुन शेकडो महिला रिसोड शहरांमध्ये आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आपला रोजगार बडवुन रिसोड ला येत आहेत.पण काही महिलांचा आधार कार्ड सेंटर वरती नंबर लागत नसुन त्या परत आपल्या घराचा रस्ता धरावा लागत आहे.हि बाब महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या लक्षात येताच तात्काळ आधार कार्ड सेंटर ची वाढ करण्या बाबतचे निवेदन देण्यात आले.यावेळी उपस्थित महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष निनाद देशमुख ,तालुका अध्यक्ष अरुण भगवानराव क्षिरसागर, सोशल मिडिया जि अध्यक्ष गणेश देगावकर,शहर अध्यक्ष प्रदिप खंडारे,नारायण आरु, डॉ रामेश्वर रंजवे, केशव गरकळ,डॉ विलास ठाकरे, डॉ प्रल्हाद कोकाटे,सचिन गांजरे,ज्ञानेश्वर कायंदे,अशोक चोपडे, जोशी सर, संदिप देशमुख,विजय सिरसाट,अमर रासकर,संतोष जुमडे व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments