प्रल्हाद साळुंखे यांना निर्भीडपत्रकारिता पुरस्कार जाहीर
प्रल्हाद साळुंखे यांना निर्भीडपत्रकारिता पुरस्कार जाहीर.
हेरवाड:नवे दानवाडचे सुपुत्र व शिवार न्यूज नेटवर्क चे धडाडीचे व निर्भीडपत्रकार श्री.प्रल्हाद तुकाराम साळुंखे यांची पुणे येथील आघाडीची वृत्तसंस्था न्यूज एक्सप्रेस तर्फे दिल्या जाणाऱ्या निर्भीड पत्रकारिता पुरस्कारासाठी निवड जाहीर झाली आहे. सदरचा पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे ७ डिसेंबर २०२४ रोजी होणार आहे.
सर्वसामान्यांच्या व्यथा व प्रश्नांना आपल्या लेखणीद्वारे मांडून न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न श्री.प्रल्हाद तुकाराम साळुंखे यांनी केला आहे. पत्रकारितेबरोबरच धार्मिक व सामाजिक कार्यात ही उल्लेखनीय कार्य करीतआहे.त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment