सततचा पाऊस-अतिवृष्टीमुळे खरीप पिकांच्या व घरांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावे - ॲड.नकुल देशमुख.
---------------------------------------
रिसोड प्रतिनिधी.
रणजित. ठाकुर.
---------------------------------------
-पंचनाम्यात रिसोड व मालेगाव तालुक्यातील कोणतेही मंडळ वगळू नये.
रिसोड - मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या सततचा पाऊस, अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांच्या खरीप पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. रिसोड मालेगाव विधानसभेसहित जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या घराच्या पडझडीसह सोयाबीन, तुर, मुंग, उडीद यासह विविध पिकाचे नुकसान झालेले आहे. या सर्व नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याची मागणी भाजप रिसोड मालेगाव विधानसभा निवडणूक प्रमुख ॲड नकुल अनंतराव देशमुख यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे. तसेच पंचनामे करताना रिसोड व मालेगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या सर्वच मंडळात नुकसान झालेले आहे ही गोष्ट पाहणी दरम्यान निदर्शनास आली आहे करिता कोणतेही मंडळ पंचनामा करताना वगळू नये आणि सरसकट पंचनामे करण्यात यावी त्यांनी पत्रकारद्वारे सांगितले आहे.मागील काही दिवसापासून पाऊस हा सातत्याने कोसळत आहे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे खरिपाचे हे पीक अगदी संपूर्णपणे नुकसान झालेले आहे. यामुळे रिसोड मालेगाव विधानसभेतील व जिल्ह्यातील शेतकरी बांधव हे या नुकसानीमुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतीत राबराब राबून मशागत करून धान्य पिकवतो अगदी तोंडाशी आलेला खरिपाचे पीक हे आशा प्रफुल्लित करत असतानाच सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे पीक हातचे निघून गेले मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी बांधवांवरती मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झालेल्या आहेत. यासाठी महायुती सरकार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार यांनी सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व सर्व माहिती सरकारचे नेते हे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन या नुकसानीची पाहणी करत आहेत. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.त्यामुळे रिसोड मालेगाव तालुक्यातील व जिल्ह्यातील कोणतेही मंडळ न वगळता शेतकरी बांधवांचे खरीप पिकाचे झालेले नुकसानीचे सरसकट पंचनामे करावे जेणेकरून एकही शेतकरी बांधव येणाऱ्या काळात या नुकसानीची भरपाई पिक विमा पासून वंचित राहता कामा नये. असे भाजप नेते ॲड नकुल अनंतराव देशमुख यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकाद्वारे म्हटले आहे.
0 Comments