वाघापुरात एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या भावंडांनी वडिलांचे स्वप्न केले साकार.
वाघापुरात एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या भावंडांनी वडिलांचे स्वप्न केले साकार.
------------------------------------
गारगोटी प्रतिनिधी
स्वरुपा खतकर
------------------------------------
पिढ्यानं पिढ्या जन्मताच मेंढरं राखत , नशिबाला आलेल्या परिस्थितीला तोंड देत वाघापूर येथील विठू डोणे आणि सोनाबाई डोणे या कुटूंबाने अनेक वर्ष मेंढरांची राखण करीत आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह केला होता.
आपल्या दाजी, कवी आणि बाळू या तीन पोरबालांच्या नशिबी हे भटकंती येऊ नये म्हणून त्यांनी आपल्या तीन लेकरांना शिक्षणाचे धडे दिले.
त्या तीन मुलापैकी बळवंत डोणे. वाघापूर यांच्या तीन मुलांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवून उत्तम कामगिरी करीत वडिलांचे स्वप्न साकार केले.
यामध्ये मुलगी धनलक्ष्मी हिने बी.ई. सिव्हिल शिक्षण घेवून जि. प. मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परिक्षेद्वारे पं. स. राधानगरीच्या बांधकाम विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर यश मिळवले आहे. मोठा मुलगा सुदर्शन डोणे (बी.ई. मेकॅनिकल) याची रत्नागिरी जिल्ह्यात महसूल विभागातील तलाठी पदी निवड झाली आहे.
तर गोवर्धन डोणे याची भारतीय डाक विभागात रत्नागिरी येथील मुख्य कार्यालयात क्लार्क पदी निवड झाली आहे.
आपल्या कुटूंबाच्या नशीबी लागलेले दुःख बाजूला ठेवून मुलांना एक दिवस अधिकारी करण्याचे ध्येय बळवंत डोणे यांनी मनाशी ठरविले. मुलांनी सुद्धा वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी शिक्षण आणि नोकरीं साठी कंबर कसली. आणि अखेर स्वप्न साकार झाले. हे ऐकून आई वडिलांचे उर आनंदाने भरून आले.
जिद्द,चिकाटीच्या आणि सातत्याच्या जोरावर परिस्थितीवर मात करत, कठोर परिश्रम अशी अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत यशाला सहजपणे गवसणी घालता येते हे या बळवंत डोणे या धनगर कुटुंबातील तिन्ही मुलांनी सिद्ध करून दाखविले आहे. या भावंडाना आई,अक्काताई,वडील बळवंत डोणे यांच्याकडून प्रेरणा तसेच गुरुवर्य बळवंत डोणे यांच्याकडून प्रेरणा व मार्गदर्शन लाभले.
एकाच कुटुंबातील तीन भावंड शिक्षनात ध्येय वेडी होऊन नोकरीत यश मिळवतात. यांचा आदर्श सर्वच पालकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
Comments
Post a Comment