कोयाळी बु,खु येथील युवक,ज्येष्ठांचा भाजप नेते ॲड नकुल देशमुख यांच्या नेतृत्त्वात भाजप पक्षात प्रवेश.
कोयाळी बु,खु येथील युवक,ज्येष्ठांचा भाजप नेते ॲड नकुल देशमुख यांच्या नेतृत्त्वात भाजप पक्षात प्रवेश.
----------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर
----------------------------------
*ॲड.देशमुखांच्या नेतृत्त्वात भाजप मधे प्रवेशाचा धडका सुरूच*
रिसोड - तालुक्यातील कोयाळी खुर्द आणि कोयाळी बु येथील ज्येष्ठ व युवकांनी भारतीय जनता पक्षामध्ये विधानसभा निवडणूक प्रमुख ॲड नकुल अनंतराव देशमुख यांच्या नेतृत्त्वात पक्षप्रवेश केला.
मागील दीड वर्षापासून रिसोड मालेगाव विधानसभा मतदार संघात भाजप रिसोड मालेगाव विधानसभा निवडणूक प्रमुख ॲड नकुल अनंतराव देशमुख यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात हजारो युवक जेष्ठ व महिलांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, तळागाळात,सर्वसमावेशक तत्वाने भाजपचे पक्ष संघटन व बळकटीकरण करण्यासाठी स्वतःला झोकून दिलेले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ,भाजप रिसोड मालेगाव सभा निवडणूक प्रमुख ॲड नकुल अनंतराव देशमुख यांच्या विकासात्मक धोरणावर विश्वास ठेवून व माजी मंत्री अनंतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनात रिसोड तालुक्यातील शेकडो युवक व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. यानिमित्त आपण प्रामाणिकपणे काम करत राहिलो की लोकही साथ देण्यासाठी हिरीरीने पुढे येतात यांची प्रचिती पुन्हा एकदा अनुभवली असे भाजप नेते ॲड नकुल अनंतराव देशमुख म्हणाले.
यावेळी भाजप जिल्हा महामंत्री गजाननराव लाटे, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष स्वप्निल सरनाईक, जिल्हा परिषद सदस्य सुभाषराव शिंदे, भाजपा तालुका सरचिटणीस भूषण पाटील, जिल्हा कार्यकारणी सदस्य तथा खविस तालुका संचालक आत्माराम आरु,शंकरराव रेखे, अडवाणी जी,ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच अनिलराव सरनाईक, दिगंबरराव खानझोडे, संतोषराव चव्हाण, पंजाबराव कोरडे, विठ्ठल घोटे, विजयराव शिरसाठ,शंकरराव भिसडे सहित मान्यवर,भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व गावकरी मंडळी तसेच गजाननराव भिसडे व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी कोयाळी भिसडे येथील दत्ता भिसडे, श्याम काळे, ओम वाघ, राधेश्याम भिसडे, पवन भिसडे, सुमित वानखेडे, नितीन भिसडे, विजय भिसडे, संतोष भिसडे, आदित्य भिसडे, विशाल भिसडे, संतोष खोडके, स्वप्निल भारती, विनोद काळे, ज्ञानेश्वर भिसडे, अरविंद मोरे, अजय भालेराव, संदीप वानखेडे, सुरज वानखेडे, गोपाल भिसडे, दत्ता भिसडे, कृष्णा खोडके, यश खोडके, मनोहर भिसडे, हनुमान भिसडे, विशाल भिसडे, चेतन काळे, परसराम काळे,नागेश भिसडे, उमेश भिसडे, राजू वानखेडे, रोहित वानखेडे, सचिन वानखेडे, वैभव वानखेडे, राजू इंगोले सहित कोयाळी शिरसाठ येथील तब्बल ४० युवक व ज्येष्ठांनी नकुल दादा देशमुख यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
Comments
Post a Comment