अमरावती विद्यापीठात विद्यार्थ्यांना विना आट कॅरी ऑन लागू. विद्यार्थी सेनेच्या आंदोलनाला यश, विद्या परिषद च्या बैठकीत प्रस्ताव मान्य.
अमरावती विद्यापीठात विद्यार्थ्यांना विना आट कॅरी ऑन लागू. विद्यार्थी सेनेच्या आंदोलनाला यश, विद्या परिषद च्या बैठकीत प्रस्ताव मान्य.
---------------------------------
फ्रंटलाईन् न्युज महाराष्ट्र.
अमरावती जिल्हा प्रतिनिधी.
पी.एन देशमुख.
---------------------------------
अमरावती.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ ने शैक्षणिक सत्र २०२४-२५ या वर्षासाठी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना विना आठ कॅरी ऑन लागू करण्यात आला आहे
कॅरी ऑन च्या मागणीसाठी विद्यार्थी सेनेच्या वतीने विद्यापीठात ३ सप्टेंबरला आंदोलन केले. यावेळी शेकडोच्या संख्येत उपस्थित विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेत कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांनी विद्यार्थ्यांना भेट देत त्यांची मागणी समजून घेतली तसेच विद्याप्रशच्या बैठकीमध्ये कॅरी ऑन च्या प्रस्तावना मान्यता देण्यात आली
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत द्वितीय व तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना कॅरी ऑन देण्यासंदर्भातील मागणी गेल्या अनेक दिवसांपासून विविध विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून येत होती. विद्यापीठातील मूल्यांकन पद्धतीने दोष असल्याने विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. मूल्यांकन करते चुकीच्या पद्धतीने मूल्यांकनामध्ये हलगर्जीपणा बाळगल्याने अभ्यास करूनही विद्यार्थी नापास झाल्याचे विद्यार्थी सेनेचे म्हणणे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी मागणी सातत्याने विद्यापीठ कडे लावून धरण्यात आली होती. परंतु विद्यापीठ प्रशासनाने याची दखल घेतली नसल्याने ३ सप्टेंबर रोजी विद्यापीठात विद्या परिषदेचे बैठक दरम्यान विद्यार्थी सेनेने विद्यापीठात ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत कॅरी ऑन च्या प्रस्ताव मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय यावेळी विद्यार्थी सेनेने घेतला होता
या आंदोलनाची दखल घेत कुलगुरू डॉक्टर मिलिंद बार हात यांनी विद्यार्थी सेनेची मागणी मान्य केली
तसेच विद्या परिषदेचे सदस्य प्रा. प्यारेलाल सूर्यवंशी यांच्याकडून हा प्रस्ताव विद्या परिषदेत ठेवून तो सर्वानुमते मान्य करण्यात आला. दोन तासानंतर स्वतःहून गुरूंनी विद्यापरिषद मध्ये घेतलेल्या कॅरी ऑन चा निर्णय वाचून दाखवला. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला आहे
कॅरी ऑन मुळे अनुत्तीरीत विद्यार्थ्यांना पुढल्या वर्षांमध्ये तात्काळ प्रवेश मिळणार आहे. यावेळी आंदोलनात युवा सेना पश्चिम विदर्भ विभागीय सचिव सागर देशमुख, विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश सोळंके, उपजिल्हाप्रमुख इम्रान सय्यद, हर्षद धोटे, शहर प्रमुख कार्तिक डकरे, भाविक कांबळे, योगेश डहाके, ऋषिकेश हिंगणकर, अनिकेत चवरे त्यांच्यासह असंख्य विद्यार्थी सहभागी होते.
Comments
Post a Comment