देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
----------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
----------------------------------
आपला देश एका वेगळ्या उंचीवर पुढे जात चालला असून देशाच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी सर्वांचे सामुहिक प्रयत्न अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वारणानगर येथील कार्यक्रम प्रसंगी केले.
वारणा विद्यापीठ उद्घाटन आणि वारणा महिला सहकारी उद्योग समूहाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की महिला विश्वाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना सक्षम, सशक्त आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी सहकाराच्या माध्यमातून वारणा समूहाने केलेले कार्य अत्यंत उलैखनीय आणि अतुलनीय असल्याचे गौरवोद्गार काढत देशविकासात वारणा सहकाराची भुमिका महत्वपूर्ण असल्याचे आवर्जून सांगितले .आज सहकारात व्यक्तीगत हिताला प्राधान्य दिले जाते त्याबाबतीत सहकारमहर्षि तात्यासाहेब कोरेंच्या दुरदृष्टीतून साकाकारलेला वारणेचा सहकार अफवाद असल्याचे सांगत आज सहकारी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून प्रोफेशनल पध्दतीने कार्य केल्यास सहकारातूनही देश समृद्ध होऊ शकतो अशी आशा व्यक्त केली.
प्रारंभी वारणा बाल वाद्यवृंदाच्या चमुनी गायीलेल्या राष्ट्रगीताने आणि दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. वारणा समुहाचे प्रमुख आमदार डॉ विनय कोरे यांनी आपल्या स्वागत प्रास्ताविकातून उपस्थितांचे स्वागत करून वारणेच्या महिला विश्वाचा सुवर्ण महोत्सव आणि शैक्षणिक क्रांतीचा हिरक महोत्सव तसेच शिक्षण समुहाला स्वतंत्र वारणा विद्यापीठ म्हणून मिळालेला बहूमानाचा कौतुक सोहळा राष्ट्रपतींच्या हस्ते झाल्याने मनापासून आनंद आणि समाधान वाटत असल्याचे आवर्जून सांगितले.
राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांचा पुष्पगुच्छ, साडी आणि सुवर्णालंकार भेट देऊन वारणा महिला समुहाच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार डॉ विनय कोरे यांच्या हस्ते राज्यपाल पी सी राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री हसन मुश्रीफ ,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धैर्यशील माने, धनंजय महाडिक यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मनोगतातून वारणेच्या समृद्ध विकासाच्या भागीदारीत महिलांचा प्रचंड सहभाग असल्यानेच वारणेची प्रगती झाल्याचे चित्र दिसून येत असून सहकारातूनही क्रांती होऊ शकते याचे ३ हजारावर उलाढाल असलेल्या वारणा चे सुंदर उदाहरण असल्याचे सांगून सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार देण्यासाठी आम्ही शिफारस करणार असल्याचे आवर्जून सांगितले. २०४७ सालापर्यंत आपणास विकसित भारत करायचा आहे त्यासाठी सर्वांचे महत्वपूर्ण योगदान मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
दरम्यानच्या काळात कार्यक्रम स्थळी सकाळच्या आणि सायंकाळच्या सत्रात किर्तनकार ज्ञानेश्वर वाबळे,शाहीर देवानंद माळी,पृथ्वीराज माळी,आशाताई सुर्यवंशी, कल्पनाताई माळी व सहकारी यांचा किर्तन व शाहीरी गाण्यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम झाला. यावेळी वारणा बालवाद्यवृंदाचा सुमधुर गीतांचा देखील कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी टी शिर्के, डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलसचिव संजय पाटील,दत्त सहकार समुहाचे प्रमुख गणपतराव पाटील, माजी आमदार शिवाजीराव नाईक, महानंदा दुधचे चेअरमन विनायक पाटील, दलितमित्र अशोकराव माने,रत्नाप्पा आण्णा कारखान्याच्या प्रमुख रजनीताई मगदूम, वारणा बँकेचे अध्यक्ष निपुणराव कोरे,युवानेते विश्वेश कोरे,जोतिरादित्य कोरे, वारणा भगिनी मंडळाच्या उपाध्यक्षा स्नेहाताई कोरे , आदिंसह कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील हजारो महिला आणि कार्यकर्ते, वारणा समुहातील विविध संस्थांचे संचालक ,पदाधिकारी, कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनासह संयोजन समितीच्या सर्वांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा नामदेव चोपडे,आणि प्रा प्रीती शिंदे पाटील यांनी केले.
0 Comments