प्रत्येक नागरिकांनी सामाजिक सलोखा ठेवला पाहिजे तहसीलदार विठ्ठल परळीकर.

 प्रत्येक नागरिकांनी सामाजिक सलोखा ठेवला पाहिजे तहसीलदार विठ्ठल परळीकर.

-------------------------------

लोहा प्रतिनिधि 

अंबादास पवार 

-------------------------------

          प्रत्येक नागरिकाने सामंजस्य भावना ठेवून उत्सव साजरा करतांना सामाजिक सलोखा बिघडला नाही पाहिजे. याची काळजी घेवून आनंदोत्सव साजरा करावा. इतरांच्या भावनेला ठेच न पोहचता सण उत्सव साजरे करावेत असे आवाहन तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी केले. लोहा पोलीस ठाण्यात गणेशोत्सवलवा निमित्त आयोजित बैठकीत तहसीलदार विठ्ठल परळीकर बोलत होते.

            गणेश उत्सव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लोहा पोलिस ठाण्याच्या वतीने ठाणे हद्दी अंतर्गत नागरिकांची शांतता समिती बैठक दि. ६ रोजी दुपारी आयोजित करण्यात आली होती त्याप्रसंगी तहसीलदार विठ्ठल परळीकर बोलत होते. बैठकीस पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पो उप नि विश्र्वदीप रोडे, न. प. चे उल्हास राठोड, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, माजी उपनगराध्यक्ष दत्ता वाले, माजी नगरसेवक भास्कर पाटील पवार आदींची उपस्थिती होती.

              पुढे बोलताना तहसीलदार परळीकर म्हणाले, सबंध देशवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री गणरायाच्या आगमनाची प्रतीक्षा गणेश भक्तांना वर्षभरापासून होती. युवकांनी गणेश उत्सव काळात कुठलीही गैर वर्तणूक करू नये. स्पर्धा परीक्षेची तयारी अथवा नोकरीच्या प्रक्रियेत असलेल्या तरुणांनी आपल्यावर कुठल्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल होऊ नये याची काळजी घ्यावी. गणेश मंडळांनी रात्री १० ते ६ कालावधी दरम्यान ध्वनिक्षेपक सुरू ठेवू नये. आगमण व विसर्जन प्रसंगी गुलाल जपून वापरावे. पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात गणेश भक्तांनी मिरवणूक काढणी. तसेच ध्वनी व डिजे चा आवाज मर्यादित नियमाप्रमाणे ठेवावेत. कुणीही कायद्याचा भंग होईल असे वर्तन करू नये. शांतता भंग झाल्यास अथवा कुणाकडूनही अप्रिय घटना घडल्यास कुणाचीही गय केली जाणार नसल्याचे परखड मत तहसीलदार परळीकर यांनी व्यक्त केले.

             शांतता समिती बैठकीस पोलीस ठाणे हद्दीतील बहुसंख्य गणेश मंडळाचे पदाधिकारी, अध्यक्ष, पोलीस पाटील, जेष्ठ नागरिक, पत्रकार व गणेश भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

         बैठकीचे सुत्रसंचलन वैजनाथ पांचाळ यांनी तर आभार पाटील यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.