Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

राधानगरी ते दाजीपूर रस्त्यावरील खड्डे मोजवण्याचे काम सुरू सार्वजनिक बांधकाम खाते.

राधानगरी ते दाजीपूर रस्त्यावरील खड्डे मोजवण्याचे काम सुरू सार्वजनिक बांधकाम खाते.

--------------------------------- 

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

--------------------------------- 

राधानगरी ते दाजीपूर रस्त्यावरील मोठ्या प्रमाणात पावसामुळे खड्डे पडले असून ते गणेश चतुर्थी पूर्वी तातडीने खड्डे भरण्यात यावेत अशी मागणी हसणे येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सावंत यांनी एका निवेद्वारे राधानगरी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे केली होती त्याची दखल घेऊन राधानगरी ते दाजीपूर रस्त्यावरील खड्डे तातडी भरण्यात सुरुवात केली असल्याची माहिती हसणे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब गंगाराम सावंत यांनी दिली


राधानगरी तालुक्यातील पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून या रस्त्यावरून कोल्हापूर कोकणात जाणारी व कोकणातून कोल्हापूर कडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत या संदर्भात हसणे येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सावंत यांनी राधानगरी येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कडे गणेश चतुर्थी पूर्वी खड्डे भरण्यात यावेत या संदर्भात लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली होती त्याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याचे उप अभियंता एस बी इंगवले व शाखा अभियंता एस के किल्लेदार यांनी लक्ष घालून तातडीने रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम तातडीने सुरू केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी इंगवले व किल्लेदार यांचे आभार मानले असल्याचे बाळासाहेब सावंत यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments