महाराष्ट्रातील कोतवालांचा २४ सप्टेंबर रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन.
,महाराष्ट्रातील कोतवालांचा २४ सप्टेंबर रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन.
----------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
----------------------------------
महाराष्ट्रातील कोतवालांना चतुर्थ श्रेणी या प्रमुख मागणी व इतर मागण्यांसाठी कोतवालानी 24 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे राज्य अध्यक्ष शिवप्रसाद देवणे व नामदेव शिंदे यांनी दिली
महाराष्ट्रातील कोतवालांना चतुर्थ श्रेणी मध्ये समाविष्ट करण्यात यावे व इतर मागण्या संदर्भात दिनांक 23 सप्टेंबर पूर्वी शासनाने मागण्या पूर्ण न केल्यास दिनांक 24 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यासमोर एका दिवशी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे या संदर्भात निवेदन आमदार प्रकाश दादा चव्हाण आमदार प्रकाश आबिटकर आमदार श्वेता ताई महाले अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग मुंबई अप्पर मुख्य सचिव महसूल विभाग मुंबई यांना देण्यात आले असून तरी महाराष्ट्रातील कोतवालानी जात्या जिल्हाधिकारी कार्यासमोर धरणे आंदोलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे असे आव्हान महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे अध्यक्ष शिवप्रसाद देवणे व नामदेव शिंदे यांनी केले आहे
Comments
Post a Comment