कोल्हापूर- पुणे वंदे भारत एक्सप्रेस ची वेळ नागरिकांच्या सोयीनुसार व्हावी : भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांची मागणी.
कोल्हापूर- पुणे वंदे भारत एक्सप्रेस ची वेळ नागरिकांच्या सोयीनुसार व्हावी : भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांची मागणी.
कोल्हापूर दि. १६ बऱ्याच दिवसापासून करवीर वासीयांचे स्वप्न असलेली वंदे भारत रेल्वे मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पुण्याकडे रवाना झाली. या निमित्ताने कोल्हापूर दौऱ्यावर असलेले केंद्रीय राज्य मंत्री मा. व्ही. सोमन्ना यांना निवेदन देऊन सदर रेल्वेची कोल्हापूरातून प्रस्थानाची वेळ सकाळी ८.१५ ऐवजी पहाटे 5.30 करावी आणि एक्झिक्यूटिव्ह वर्गाचे तिकीट दर २००५ रुपये वरुन १५०० रुपये इतके केले असता प्रवाश्यांचा प्रतिसाद आणखी वाढेल.
सध्या होणारा कोल्हापूर पुणे प्रवास हा मुंबई पर्यंत वाढवल्यास कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हयातील नागरिकांना या रेल्वेचा खऱ्या अर्थाने फायदा होईल. या निवेदनावर केंद्रीय मंत्र्यांनी सहमती दर्शवत लवकरच या बाबतचा निर्णय रेल्वे मंत्रालयाच्या वतीने घेण्यात येईल असे आश्वासन जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांना दिले.
कृपया प्रसिद्धीसाठी, आपला
मा.संपादकसो, शंतनू मोहिते
दै. भाजपा कार्यालय प्रमुख
Comments
Post a Comment