मेढा आरोग्य विभागाबाबत आक्रमक पवित्रा घेणार -अंकुश बाबा कदम.

 मेढा आरोग्य विभागाबाबत आक्रमक पवित्रा घेणार -अंकुश बाबा कदम.

------------------------------------------

भणंग प्रतीनिधी

 शेखर जाधव 

------------------------------------------

.भणंग -:जावली ची राजधानी मेढा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत स्वराज्य पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अंकुश बाबा कदम यांनी  जावलीच्या सुपुत्राने स्वाभीमान बाळगायचा नाही तर कोणी बाळगायचा .? असा सवाल   मेढा नगरीत दही हंडी झाली त्याला जावलीची स्वाभीमानी हंडी असे नाव का  दिले  या पत्रकारांचे प्रश्नाला उत्तर देताना अंकुश बाबा म्हणाले

जावली तालुक्यातील प्रस्थापिताचा ठेकेदार कार्यकर्ता यांचा चिठ्ठा पिल्ला माझ्याकडे आहे. तो ठेकेदार नादाला लागला तर जावलीचा सुपुत्र म्हणुन पुरुन उरेन अशी जहरी टीका 

स्वराज्यपक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अकुंश बाबा कदम यांनी केली  तालुक्यातील विकास काम नक्की सर्वसामान्यकरीता कि ठेकेदाराकरीता केले जात असुन असा प्रश्न जावलीत निकृष्ठ दर्ज्याच्या

कामावरुन निर्माण झाला आहे. विकास कामाचे ठेके मॅनेज करत ठेक्यातुन फक्त पैसा काढायचा

असा एकमेव उद्योग जावलीतील ठेकेदार करत असल्याची टीका यावेळी अकुश बाबा कदम यांनी

केली 

जावलीत विकासच पर्व निर्माण करायच आहे याकरीता चर्चेला तयार आहे. मात्र माझ्या या  गुणाचा कोणी गैरफायदा घेण्याचा उद्योग केला तर. याद राखा मी पण जावलीचा सुपुत्र आहे पुरुन उरल्याशिवाय राहणार नाही जावली तालुक्यात पर्यटनाला चालना देत असताना निसर्ग सौदर्याचा फायदा घेत रोजगार निर्माती साठी मी प्रयत्न शील राहणार आहे. 

मेढा येथे रुग्नवाहीका लवकरच देणार असलेचे सांगितले गेली पंधरा वर्ष मी महाराष्ट्रात काम करीत आहे परंतु माझा जावली तालुका सुखी नसेल तर मी महाराष्ट्रात काम करून काय उपयोग  , त्यासाठी मी जावलीत आलोय मी काय टक्केवारी तील माणूस नाही तालुक्याच्या विकासासाठी मी एकत्र यायला तयार आहे तसेच मी शेतकरी मेळावा, दही हंडी कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाला जाऊ नका म्हणून कार्यकर्ते, अधिकारी यांना धमकविले पण असे असेल तर वेळप्रसंगी आम्ही जशास तसे उत्तर देऊ कारण त्यांचा चिठ्ठा पिल्ला माझेकडे आहे 

आरोग्य  विभागातील रिक्त पदाकरीता पाठपुरावा करुन लवकरच रीक्त पदे  भरण्यासाठी मी  प्रयत्न करणार आहे

    मेढा येथे  भावी आमदार बैनर वर लिहिले मुळे बऱ्याच जणांचे धाबे दणाणले आहे  तालुक्यात कोणताही गाजावाजा न करता कोटींचा निधी आणला आहे  जावळी - सातारा मतदार संघात आमदार की लढवणार का या  प्रश्नाला उत्तर देताना राजकारणात काही ही होवू शकत . असे उत्तर देवून विषयाला कलाटणी दिली  पत्रकार परिषद वेळी  उमेश जुनघरे, शंकर दुदळे, सचिन जवळ, यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थीत होते

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.