संविधान मंदिराचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते उदघाटन.
संविधान मंदिराचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते उदघाटन.
-----------------------------------
लोहा प्रतिनिधी
अंबादास पवार
-----------------------------------
कौशल्य रोजगार उद्योजगता व नावीन्यता विभाग व व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र शासनाच्या वतीने दि. 15 सप्टेंबर रोजी लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते लोहा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मध्ये संविधान मंदिराचे उद्घाटन मोठया उत्साहात करण्यात आले, यावेळी प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य नाईकनवरे सर, खरेदी विक्री संघाचे उपसभापती श्याम अण्णा पवार, बोरगावचे सरपंच प्रतिनिधी पुंडलिक पा. बोरगावकर, लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धोंडिबा पा. पवार,उप प्राचार्य पाटील सर, ॲड. पवार, महाबळे सर,शेकाप तालुका अध्यक्ष नागेश पा. हिलाल , खरेदी विक्री संघाचे संचालक सुधाकर सातपुते,संभाजी पा. कदम, वाघमारे सर, पाटील सर, गुदे सर, सेवानिवृत्त लिपिक पंडीत सर, वाघमारे मॅडम, सचिन कल्याणकर सह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सर्व कर्मचारी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment