तब्बल चाळीस वर्षानंतर कुरणेवाडीतील स्मशानशेडचा प्रश्न मार्गी :: सह्याद्री साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब नवणे ::.कोरे दापत्यांच्या सततच्या प्रयत्नांना यश !

 तब्बल चाळीस वर्षानंतर कुरणेवाडीतील स्मशानशेडचा प्रश्न मार्गी :: सह्याद्री साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब नवणे ::.कोरे दापत्यांच्या सततच्या प्रयत्नांना यश !

----------------------------

कौलवप्रतिनिधी 

संदीप कलिकते

----------------------------

              जाधववाडी ,लाडवाडी, तुळशी धरण वसाहत, नऊनंबर आदी वाड्यावस्त्यासह मिळून बनलेल्या धामोड पैकी कुरणेवाडीतील स्मशान शेडचा प्रश्न ग्रा.प सदस्या नेत्रांजली कोरे व सामाजिक कार्यकर्ते विनायक कोरे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळेच कायमचा मार्गी लागला असल्याचे प्रतिपादन सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब नवणे यांनी केले.                                                 कुरणेवाडी (ता राधानगरी) येथे आमदार प्रकाशराव आबिटकर यांच्या आमदार फंडातून मंजूर दहा लाख रुपयाच्या स्मशानशेड बांधकाम शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी सरपंच सौ रेश्मा नवणे होत्या .उपसरपंच विमल बोडके ,ग्रा.प. सदस्य एन.जी नलवडे ,विश्वास गुरव, विलास कदम ,मारुती तामकर, सुभाष कदम ,विलास पाटील, नेत्रांजली कोरे, स्नेहा नलवडे,  सिरमाताई चौगले ,सुवर्णा पाटील, रोहिणी तेली ,कविता कांबळे प्रमुख उपस्थित होते स्वागत ग्रामसेवक संतोष गुरव यांनी केले विनायक कोरे यांनी प्रास्ताविक केले.

 -------------------------------------------- 👍चौकट 👍           

 .......हे केवळ यांच्यामुळेच शक्य !

        गेली चाळीसवर्षे स्मशानशेडसाठी कोणीही ग्रामस्थ आपली जमीन देत नव्हते परंतु येथील सामाजिक कार्यकर्ते विनायक कोरे,ग्रा.प. सदस्या नेत्रांजली कोरे व वसंत कुरणे यांनी जाधववाडी येथील शेतकरी प्रकाश जोंधळकर यांची एक गुंठा जमीन स्मशानशेडसाठी मिळवून गेली चाळीस वर्षे जो प्रश्न गावाला भेडसावत होता तो मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले .

  -----------------------------------------------              ग्रा.पं.च्या सर्व पंचकमटीला विश्वासात घेऊन ग्रुप ग्रा.पं.च्या माध्यमातून वाड्यावस्तीसह गावातील मूलभूत समस्यांना प्रथम प्राधान्य देऊन त्या समस्या हळूहळू निकालात काढणार असल्याचे मत सरपंच सौ रेश्मा नवणे यांनी यावेळी व्यक्त करुन जमीन मालक प्रकाश जोंधळकर सामाजिक कार्यकर्ते विनायक कोरे वसंत कुरणे यांचा सरपंच रेश्मा नवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ग्रुप ग्रा.पं.चे सर्व सदस्य, सहकारी संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामसेवक संतोष गुरव यांनी आभार मानले .

👍फोटो 👍कुरणेवाडी (ता राधानगरी) येथील स्मशानशेड बांधकाम शुभारंभ प्रसंगी बाळासाहेब नवणे, सौ रेश्मा नवणे,नेत्रांजली कोरे ,प्रकाश जोंधळकर विनायक कोरे ,वसंत कुरणे व ग्रा.प. पदाधिकारी

.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.