अमरावती महानगरातील वाढीव मालमत्ता कर आकारणी, वसुलीस स्थगिती, आदेश जारी. सीएमच्या पत्रावर शासनाचे ५ सप्टेंबरला आदेश, आता जुनीच कर आकारणी.
अमरावती महानगरातील वाढीव मालमत्ता कर आकारणी, वसुलीस स्थगिती, आदेश जारी. सीएमच्या पत्रावर शासनाचे ५ सप्टेंबरला आदेश, आता जुनीच कर आकारणी.
----------------------------------
फ्रंटलाईन् न्यूज महाराष्ट्र.
अमरावती जिल्हा प्रतिनिधी.
पी.एन.देशमुख.
----------------------------------
अमरावती.
अमरावती महानगरपालिकेच्या वतीने २०२३च्य वर्षापासून लागू करण्यात आलेली वाढीव मालमत्ता कर आकारणी आणि वसुली शासनाने स्थगिती दिली आहे. या संदर्भात नगर विकास विभागाने ५ सप्टेंबर रोजी आदेश निर्गमित केल्या असून, यामुळे नागरिकांना वाढीव मालमत्ता कर आकारणीपासून तूर्तास दिलासा मानला जात आहे. नवीन कर सुधारणा व नवीन कर आकारणी ही गत वर्षाच्या कर मूल्य निर्धारणला अनुसरून नसल्याने मालमत्ता धारकांना आलेले कर भाडे हे चार पटीवरून अधिक असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. राजकीय व सामाजिक संघटनांनी वाढीव घर टॅक्स रद्द करण्यासाठी मोर्चे आंदोलन करून प्रशासनाच्या निदर्शनास नागरिकांच्या भावना लक्षात आणून दिल्या होत्या
काही सुजाण नागरिकांनी प्रशासनाच्या मालमत्ता कर वाढीव विरोधात उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली आहे. आमदार सुलभा खोडके यांनी हा विषय शासन स्तरावर रेटून धरला. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री द्वारे सातत्याने पाठपुरावा केला. बैठकी सुद्धा घेण्यात आल्यात. अखेर राज्य शासनाने मनपाने नागरिकावर लाभलेल्या वाढीव मालमत्ता कर आकारणी आणि वसुली स्थगिती दिली आहे. आता कर आकारणीही २००५ नुसार केली जाणार असल्याची माहिती शुक्रवारी पत्र परिषद आमदार सुद्धा खोडके राष्ट्रवादी नेते संजय खोडके आयुक्त सचिन कलंत्री यांनी संयुक्तपणे माहितीदिली. आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे २५ ऑगस्ट रोजी दिलेल्या पत्रात अमरावती मनपा क्षेत्रातील मालमत्ता वाडीकर आकारणीला स्थगिती द्यावी. अशी मागणी केली. त्या पत्रावर मुख्यमंत्री शिंदे यांनी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना रिमार्क करताना वाढीव मानमत्ता कर देण्याबाबत निर्देश दिले होते. अमरावती महानगर नव्याने ५५ हजार मालमत्ता ची नोंद करण्यात आली आहे. या मालमत्ता वाणिज्य तथा निवासी असून त्यांच्यावरही जुन्या पद्धतीने कर आकारणी होणार कोटीच्या वर मालमत्ता कर ८० लक्ष कोटीच्या वरआहे. कर आकारणीला स्थगिती देत असताना शासनाकडून नगर महानगरपालिकेच्या अनुदान मिळणार आहे. वाढीव मानता कर आकारणी व वसुली स्थगिती देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा मोठा वाटा आहे. वाढीव मालमत्ता कर आकारणी व वसुली स्थगिती देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे वाढीवकरापासून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी सतत प्रयत्न करण्यात आलेले आहे नव्या अध्यक्ष नुसार आता जुन्यास पद्धतीने मालमत्ता करा कारणीभूत केली जाईल यांनी यापूर्वी कराचा भरणा केला असेल ती रक्कम समजीत करण्यात येईल नव्या आदेशानुसार आता जुन्या पद्धतीने मालमत्ता कर आकारणी आणि वसुली केली जाईल. नव्या आदेशानुसार आता जुन्या पद्धतीने मालमत्ता आकारणी आणि वसुली केली जाईल यांनी यापूर्वी करता भरणा केला अशा यांची रक्कम समायोजने करण्यात येईल त्यांनी कर भरला नाही अशांना दुरुस्ती करून जुन्या पद्धतीने करायचे असे मनपा आयुक्त सचिन कलंत्री यांनी आमच्या प्रतिनिधी माहिती दिली.
Comments
Post a Comment