हम साथ साथ है म्हणत शेकडो महिला शिक्षकांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण.
हम साथ साथ है म्हणत शेकडो महिला शिक्षकांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण.
शिक्षकांचा वाढीव टप्पा जीआर तात्काळ मिळालाच पाहिजे.
उद्या खासदार श्रीकांत शिंदे यांची कोल्हापूर येथे कृती समिती भेट घेणार.
*5 सप्टेंबर 2024 पर्यंत निर्णय न घेतल्यास शिक्षक दिनादिवशी शाळा बंद करून रास्ता रोको करणार*
राधानगरी /विजय बकरे - अंशता: तसेच विनाअनुदानित शिक्षकांचे वाढीव टप्प्यासाठी तसेच प्रलंबित प्रश्नांसाठी आंदोलन सुरू आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर जिल्ह्यातील शिक्षकांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. सोमवारी आठव्या दिवशी विनाअनुदानित कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांची प्रकृती पूर्णपणे खालावली आहे. त्यांच्याबरोबर संदीप भोरे, नेहा भुसारी, रेश्मा सनदी हे उपोषणाला बसले आहेत. गेल्या एक महिन्याहून अधिक दिवस सुरू असणारे साखळी उपोषण आणि आज आमरण उपोषणाच्या आठव्या दिवशी जिल्ह्यातील शेकडो महिला शिक्षकांनी हम साथ साथ है म्हणत उपसंचालक कार्यालय कोल्हापूर येथे 200 ते 300 महिला एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून आंदोलकांना आपला पाठिंबा दिला. राज्यातील कानाकोपऱ्यातून अनेक शिक्षक कोल्हापूर येथे येत आहेत.
मुंबई चे संजय डावरे,नगर चे राजेंद्र जाधव शिवाजी खुळे सिद्धार्थ साबळे,सोलापूर चे संग्राम कांबळे,बीड चे वैद्यनाथ चाटे,यांच्या बरोबर आलेले अनेक शिक्षक आज कोल्हापूर मध्ये दाखल झाले,
दरम्यान काल दुपारी 4.20 वाजता शिक्षणमंत्री दिपकजी केसरकर यांचा फोन जगदाळे सर यांना आला,त्यांनी सांगितले की आपण आमरण उपोषण मागे घ्यावे टप्पा वाढीबाबत ची फाइल उद्या अर्थ विभागाकडे पाठवत आहे. त्यानंतर येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत ती येईल मी लवकरच आदेश काढण्यासाठी प्रयत्नशील आहे, उपोषण सोडा ही विनंती केली. मंत्री केसरकरांच्या विनंतीला मान देऊन फक्त ज्युस घेण्याचा निर्णय उपोषणकर्त्यांनी घेतलेला होता पण अजूनही फाइल आली नाही असे कळते. हा शासनाचा विश्वासघात चालणार नाही.
" खंडेराव जगदाळे यांची प्रकृती खूपच खालावली"
दरम्यान आज मुख्यमंत्र्यांचा कोल्हापुरचा दौरा रद्द झाल्याने शिक्षकांच्यात निराशा पसरली. गेले दोन दिवस जगदाळे यांची तब्बेत खूपच खालावली असून रात्री अपरात्री त्यांना मोठा त्रास होतोय. आज दुपारी बारा वाजता त्यांची तब्बेत फारच बिघडली. १०८ रुग्णवाहिका आली तरीही खंडेराव जगदाळे यांनी उपचारास तसेच ऍडमिट होण्यास नकार दिला. जर शासनाने 5 सप्टेंबर 2024 पर्यंत निर्णय घेतला नाही तर 5 सप्टेंबरला कृती समिती सर्व शाळा बंद करून रास्ता रोको करणार आहेत. उपोषणाकर्ते यांची प्रकृती खूपच ढासळली असली तरी आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत जोपर्यत निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. असे जिल्हाध्यक्ष शिवाजी कुरणे यांनी सांगितले.
यावेळी मराठवाड्याचे कृती समितीचे कार्याध्यक्ष वैजनाथ चाटे, मुंबईचे संजय डावरे, महेंद्र वाघमारे, जिल्हाध्यक्ष शिवाजी कुरणे, सुभाष खामकर, प्रमोद पाटील, अनिल ल्हायकर, मच्छिंद्र जाधव, केदारी मगदुम, भानुदास गाडे, सावंता माळी, जयदीप चव्हाण, शिवाजी घाटगे, अविनाश पाटील,अरविंद पाटील, राजू भोरे, प्रमोद पाटील शशिकांत खडके सुनील शेंडे,मनोहर चव्हाण संदीप काळे, भाग्यश्री राणे, जयश्री पाटील,गौतमी पाटील स्मिता उपाध्ये, सीमा कागवाडे, आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment