कोल्हापूर जिल्हा महिला काँग्रेस आय च्या अध्यक्ष सौ सुप्रिया सुधाकर साळोखे यांची फेर निवड.
कोल्हापूर जिल्हा महिला काँग्रेस आय च्या अध्यक्ष सौ सुप्रिया सुधाकर साळोखे यांची फेर निवड.
-------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
-------------------------
येथील सौ सुप्रिया सुधाकर साळोखे यांना कोल्हापूर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून फेर निवड करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्या सव्वा लाखे यांनी दिली
कोल्हापूर जिल्हा महिला काँग्रेसचे अध्यक्ष सौ सुप्रिया सुधाकर साळोखे या पूर्वी यांची निवड करण्यात आली होती पण त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात महिला काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून चांगली कामगिरी केली असून त्यांची दखल आमदार सतेज उर्फ बंटी पाटील कै आमदार पी एन पाटील खासदार शाहू महाराज यांनी अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष श्रीमती अलका लांबा यांच्याकडे केली त्यांनी त्याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी सौ सुप्रिया साळोखे यांची फेर निवड केली असल्याचे पत्र सौ सुप्रिया साळोखे त्यांना देण्यात आले, त्यामुळे काँग्रेसच्या हात बळकट झाल्याचे प्रतिक्रिया सौ सुप्रिया साळोखे यांनी दैनिक सुपर भारत प्रतिनिधी विजय बकरे यांना दिली
पुन्हा आयकाँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे महिला काँग्रेस च्या अध्यक्षा सुप्रिया साळोखे यांनी सांगितले
Comments
Post a Comment