सणासुदीच्या दिवसात भाकरी, रेशन दुकानातून गहू गायब! अंत्योदय सह प्राधान्य गटातील ४.९६ लाख शिधापत्रिकाधारकांमध्ये नाराजीचा सूर.
--------------------------------
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
पी.एन.देशमुख.
--------------------------------
अमरावती.
सण उत्साहाच्या कालावधीत रेशन धान्यातून गोर गरीब लाभार्थ्यांना गवाएवजी ज्वारी देण्यात येत आहे. यामध्ये आगस्ट महिन्यात ज्वारीचे वाटप करण्यात आलेले आहे व पुढील तीन महिने पुन्हा ज्वारीचे वाटप होणार आहे. अंतोदय व प्राधान्य गटातील ४.९६ लाख शिधापत्रिका मध्ये नाराजी आहे. आधारभूत किंमत योजनेद्वारे जिल्ह्यात ज्वारीचे खरेदी करण्यात येत आहे व ही ज्वारी आता सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे अंतोदय व प्राधान्य गटातील शेतकऱ्यांना वाटप करण्यात येत आहे. तसे आदेश राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाद्वारा २५ जून रोजी देण्यात आलेले आहे. त्यामुळे गावाच्या कोटा कमी करण्यात आलेला आहे व त्याऐवजी ज्वारीचे वाटप करण्यात येत आहे. तसेच पाहता ज्वारी ही काही गोर गरीबाची राहिली नाही. मार्केटमध्ये गव्हा पेक्षा ज्वारीला भाव जास्त आहे. मात्र, रेशन धान्य ज्वारी मिळत नाही. त्यातच सणाच्या दिवशी भाकरी केल्या जात नाहीत. अंतोदय शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी १० किलो ज्वारी, ५ किलो गहू व २० किलो तांदूळ सध्या रेशन मधून दिल्या जात आहे. आता सनसाच्या दिवस आल्याने पूर्वीप्रमाणेच रेशन मधून धान्य देण्याची मागणी आहे. प्राधान्य गट या कार्डधारकांना त्यांच्या कुटुंबातील प्रति लाभार्थी १ किलो ज्वारी व ४ किलो तांदूळ रेशन दुकानातून दिले जात आहे. त्यामुळे ज्वारी योगी गव्हाचे वाटप करण्याची लाभार्थ्यांना मागणी लाख रेशन कार्ड असून, अंतोदयाचे १.२८ लाख जिल्ह्यात अंत्ययाचे १,२७,९१४ कार्डधारक आहेत. यामध्ये ४,७६,६९५ युनिट संख्या आहे. या लाभार्थ्यांना दरमहा ३५ किलो रेशन धान्य मिळते. प्राधान्य गट ३.६८ लाख जिल्ह्यात प्राधान्य गटात ३.६८,०११ शिधापत्रिका धारक आहेत. यामध्ये १४,८९,८६० युनिट संख्या आहे. या लाभार्थ्यांना दरमहा प्रति व्यक्ती पाच किलो धान्य मिळते. आता तर गहू गायब झाले असून नुसतीच जवारी मिळते. यावर्षी शासनाद्वारे भरड धान्याची खरेदी करण्यात आलेली आहे. त्यामुळे रेशन दुकानातून गव्हा ऐवजी ज्वारी देण्यात येत आहे. यामध्ये पुढील तीन महिने ज्वारीचे वाटप होईल. ही ज्वारी दिवाळीपर्यंतच मिळणार असे संकेत आहेत. ऑगस्टमध्ये २७,७९० क्विंटल ज्वारीचे वाटप झाले. यामध्ये अंतोदय गटात १२,८०७ क्विंटल, तर प्राधान्य गटात १४,९८३ क्विंटल ज्वारीची आवश्यकता आहे. रेशन मध्ये दिवाळीपर्यंत ज्वारीची वाटप होऊ शकते."रेशन मधून गहू गायब झालेले नाही तर गव्हाचे वाटप सुरूच आहे व सोबत काही प्रमाणात ज्वारी देखील दिल्या जात आहे"असे प्रज्वल पाथरे ए डी एस ओ अमरावती यांनी आमच्या प्रतिनिधी सांगितलेले आहे रेशन मधून गव्हाचे वाटप कायम ठेवण्यात यावे व सोबतच जवारी अन साखरही देण्यात यावी अशी मागणी विमलाबाई ठाकरे लाभार्थी यांनी केलेले आहे.
0 Comments