पिस्तुलाचा धाक दाखवून लुटणाऱ्या आरोपींचा पाठलाग करुन केलं जेरबंद.गाडगे नगर पोलिसांची कारवाई.
पिस्तुलाचा धाक दाखवून लुटणाऱ्या आरोपींचा पाठलाग करुन केलं जेरबंद.गाडगे नगर पोलिसांची कारवाई.
-------------------------------------
फ्रंट लाईव्ह न्यूज महाराष्ट्र.
अमरावती जिल्हा प्रतिनिधी.
पी.एन.देशमुख.
-------------------------------------
अमरावती.
अमरावती येथील सुवर्णकार अरविंद जावरे यांच्याकडील चांदीचे १५ किलोची बॅग हिसकावुन पळ काढणाऱ्या लुटारुंच्या मुख्य सुत्रधाराला अटक करण्यात गाडगे नगर पोलिसांच्या डीबी पथकाला यश आले. धनंजय योगेंद्रसिंग यादव वय २५ बजनखान अंत जि. प्रतापगड उत्तर प्रदेश याला शुक्रवारी उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली. गाडगे नगर पोलीस त्याला घेऊन शनिवारी अमरावती परतले. यापूर्वी या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, ते सर्वजण पोलीस कोठडीत आहेत. धनंजय योगेंद्रसिंग यादव हा लूट प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांनी सांगितले. रेखा कॉलनी येथील अरविंद उत्तमराव जावरे ५५ वय, जवाहर नगर हे चार सप्टेंबर रोजी सकाळी ११.३०च्या सुमारास वडीला सोबत मोठे आपल्या ज्वेलरी शाॅपकडे जात होते. दरम्यान शीतला माता मंदिर जवाहर नगर येथे चार ते पाच लुटारुंच्या टोळक्याने त्यांना अडविले. आरोपींनी मोपेडच्या पायदनावरील चांदी असलेली १५ किलो वजनाची बॅग जबरदस्तीने हिस्कवली. जावरे यांनी विरोध केला असता आरोपींनी त्यांना पीस्टल दाखवून. माराहाण देखील केली होती. याप्रकरणी गाडगे नगर पोलिसांनी दरोडाच्या गुन्हा दाखल केला होता. आरोपीवर प्रतापगडी व दर्यापूर, अमरावती या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे शाखा युनिट ऐकने यापूर्वी नागपूर येथून आरोपी गौसउद्दीन वाहजोद्दीन कुरेशी, मोहम्मद सादिक खान हारून खान, प्रेम उर्फ प्रेमदास महादेवराव नितनवरे, विनोद शंकरराव गिरे, व संजय बाबुलाल बीनकर यांना अटक केली आहे. या गुन्ह्यातील इतर आरोपी हे उत्तर प्रदेशात पळून गेल्याने गाडगे नगर पोलीस ठाण्याचे डीबी पथक प्रतापगड येथे गेले होते. तेथून शुक्रवारी सायंकाळी आरोपी धनंजय यादव याला ताब्यात घेण्यात आले. पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, पोलीस उपयुक्त सागर पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गाडगे नगरचे ठाणेदार प्रशांत माने यांच्या नेतृत्वात डीबी प्रमुख तथा सहाय्यक पोलीस निरक्षक मनोज मानकर, उपनिरीक्षक संजय डाखोरे, अमलदार भारत वानखडे, संजय इंगळे, गुलरेज खान, नितीन कांबळी, सागर भोजने यांनी ही कारवाई केली.
Comments
Post a Comment