अति दुर्गम असणाऱ्या अडोली गावात हॉटेल बाहुबली चे उद्घाटन कोल्हापूरच्या वकील रेखा भोसले यांच्या हस्ते.
-------------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
-------------------------------------
राधानगरी तालुक्यातील प्रसिद्ध असणारा अडोलीचा धबधबा हा अत दुर्गम असणारा भाग असून या ठिकाणी हॉटेल बाहुबली चे उद्घाटन कोल्हापूरच्या प्रसिद्ध वकील रेखा भोसले भुदरगड तालुका मनसेचे अध्यक्ष अशोक पाटील यांच्या हस्ते नुकतीच करण्यात आले
कोल्हापूरच्या वकील रेखा भोसले म्हणाले की अडोली हे गाव अगदी दुर्गम असताना प्रसिद्ध असणारा तोरस्करवाडी चा धबधबा या ठिकाणी हॉटेल बाहुबली घालून येणाऱ्या पर्यटकांची सोय केल्याने येणारे पर्यटक चुलीवरच्या जेवणाचा स्वाद घेऊ शकतील असा विश्वास भोसले यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला
त्या उद्घाटनास कोल्हापूर डिस्ट्रिक्ट अँड स्पेशनस कोर्ट सखाराम बेतम भुदरगड तालुका मनसेचे अध्यक्ष अशोक पाटील युवराज पठाडे संजय पाटील धोंडीराम महाबळे शरद महाबळे गीता पाटील सत्यजित तोरस्कर विलास तोरस्कर सिताराम जाधव सुरेश ढोकरे सागर चव्हाण प्रकाश तोरस्कर बबन बाणे हे उपस्थित होते
0 Comments