वडिलार्जित मालमत्तेच्या वादातूनच केला सख्या भावाचा खून.अवघ्या काही तासांतच आरोपी गजाआड.

 वडिलार्जित मालमत्तेच्या वादातूनच केला सख्या भावाचा खून.अवघ्या काही तासांतच आरोपी गजाआड.

--------------------------------

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

--------------------------------

आरोपी:-आनंद खेमलापुरे


आरोपी:-प्रवीण हालोंडे

चांदी उद्योजकाचा सिल्वर झोन मध्ये रविवारी दिवसाढवळ्या निर्घृण खून झाला होता या खूना मुळे हुपरी परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान खूनाच्या घटनेनंतर तासाभरातच हुपरी पोलिसांनी त्याचा छडा लावून मयताच्या सख्या भावाला अटक केली चांदी देवघेव आणि वाटणीच्या वादातून सख्या भावानं मित्राच्या साह्याने सख्या उद्योजक भावाचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील सिल्वर झोन मध्ये राहणारे 29 वर्षे ब्रम्ह नाथ सुकुमार हालोंडें या तरुण चांदी उद्योजकाचा अज्ञात हल्लेखोरांनी निर्घृण पणे खून केल्याचे उघड झालं होते खून करून  घराच्या तिजोरीतील 25 किलो चांदी आणि दागिनेही लंपास केले होते. या खूनाच्या घटनेमुळे चांदी व्यवसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती या घटनेचा तपास हुपरी पोलीस गोकुळ शिरगाव पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण यांनी संयुक्तरीत्या केला आणि तासाभरातच ब्रम्ह नाथाच्या सख्खा भाऊ पवन उर्फ प्रवीण हालोडें आणि त्यांचा मित्र आनंद खेमलापुरे या दोघांना अटक केली चांदी देवघेव आणि घराच्या वाटणीच्या वादातून मित्र आनंद खेमलापुरे यांच्या मदतीने खून केल्याची कबुली पवन उर्फ प्रवीण दिली. दरम्यान पवनचा उर्फ प्रवीणचा मित्र आनंद खेमनापुरे यांच्या घरातून ब्रम्हनाथ यांची चांदी आणि दागिने पोलिसांनी जप्त केले दरम्यान सख्या भावाने भावाचा खून केल्याचे स्पष्ट होताच हुपरी शहरात मोठी चर्चा होत आहे रात्री उशिरा घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे शिरोली पोलीस निरीक्षक पंकज गिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक सतीश कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड पीएसआय प्रसाद कोळपे हवालदार नितेश कांबळे दीपक मोरे दर्शन धुळे यांनी संयुक्त तपास यंत्रणा कार्यान्वित केली होती खून झाल्यानंतर अवघ्या काही तासातच त्या खूनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.