नागाव गावातून आमदार राजू बाबा आवळे यांना मताधिक्य देण्याची ग्वाही - पंचायत समिती सदस्य श्री उत्तम गुंडा सावंत.

 नागाव गावातून आमदार  राजू बाबा आवळे यांना मताधिक्य देण्याची ग्वाही - पंचायत समिती सदस्य श्री उत्तम गुंडा सावंत.

ते आमदार राजूबाबा आवळे यांच्या संपर्क दौऱ्यानिमित्त कार्यक्रमात बोलत होते याप्रसंगी आमदार राजूबाबा आवळे, नागाव सोसायटी चे चेअरमन श्री महावीर पाटील  हातकणंगले तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भगवानराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

उत्तम सावंत यांनी गावातील विकासकामाना आजवर केलेले सहकार्य व पाठपुरावा करून उपलब्ध करून दिलेल्या निधीची माहिती देत आम - आवळे यांना गावातून मताधिक्य देण्याची आवाहन केले  

नागाव सोसायटीचे चेअरमन श्री महावीर पाटील यांनी  विधानसभेची निवडणूक काही दिवसांवर आले आहे या  कालावधीत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्यावर वेगवेगळ्या माध्यमातून दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या भीतीला कोणीही किंमत देऊ नये.व गावातून आमदार आवळे यांना जास्तीत जास्त मताधिक्य देवून सर्वांनी प्रयत्न करावेत असे त्यांनी  सांगितले. 

यावेळी बोलताना राजूबाबा आवळे म्हणाले की,आपल्या मतदार संघातील युवकांना रोजगारासाठी पुणे,मुंबई यासारख्या अनेक ठिकाणी जावे लागते.या बाबींचा विचार करून आपल्या मतदारसंघातच विविध इंडस्ट्रियल पार्क उभे करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.तसेच नागाव गावामध्ये माझ्या माध्यमातून हजार लोकांना पेन्शन उपलब्ध करून दिली आहे.विविध विकासकामांना निधी उपलब्ध करून दिला आहे.तर गॅस ,वीज दरवाढ व जिएसटी च्या माध्यमातून सर्व सामान्य लोकांची महायुती सरकारने आर्थिक लुट सुरू केली आहे.यातून सुटका होण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी ची सत्ता येणार आहे,त्यामुळे पुन्हा एकदा आपण सर्वांनी मला निवडून देऊन सहकार्य करावे.  लागेल तेवढा निधी देण्याची ग्वाही आवळे यांनी दिली.

या प्रसंगी तालुका उपाध्यक्ष उत्तम पाटील,आघाडी प्रमुख डॉ. गुंडा सावंत, दिपक लंबे,अनिल शिंदे, भाऊसो पाटील,महंमद मुलाणी,ग्रामपंचायत सदस्य अजित घाटगे,अभिनंदन सोळांकुरे,सतीश लंबे,अमित खांडेकर, गजानन पोवार,विलास चव्हाण, बबलू लंबे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.