भाजप व महायुतीचे विकास व लोकहिताचे कामे जनतेपर्यंत पोहोचवुन पक्ष संघटन अधिक बळकट करा-चंद्रशेखर बावनकुळे.
भाजप व महायुतीचे विकास व लोकहिताचे कामे जनतेपर्यंत पोहोचवुन पक्ष संघटन अधिक बळकट करा-चंद्रशेखर बावनकुळे.
-------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर
-------------------------------
*भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद*
रिसोड - .......................मालेगाव विधानसभा अंतर्गत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रिसोड येथे स्थानिक जीबी लॉन कार्यक्रमात संवाद साधला.
रिसोड विधानसभा मतदारसंघातील प्रमुख भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीस संबोधित करताना, महाविकास आघाडीचा खोटा नरेटिव्ह जनतेपर्यंत पोहचण्याच्या अगोदर महायुतीच्या लोकाभिमुख कारभाराचे सत्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.
कार्यक्रमास आगमन प्रसंगी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे रिसोड येथे जंगी स्वागत करण्यात आले.प्रसंगी भाजप प्रदेशाध्यक्ष यांचे स्वागत भाजप रिसोड मालेगाव विधानसभा निवडणुक प्रमुख ॲड नकुल अनंतराव देशमुख यांनी केले.तसेच माजी मंत्री अनंतराव देशमुख,माजी आमदार विजयराव जाधव,जिल्हा अध्यक्ष शाम बढे, ॲड.नकुल देशमुख यांचा सत्कार पार पडला.यावेळी भाजप पदाधिकारी आणि उपस्थित कार्यकर्ते यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, मंडळ पदाधिकारी,सर्व मोर्चा कार्यकारिणी पदाधिकारी, रिसोड मालेगाव विधानसभा अंतर्गत येणारे सर्व जिल्हा पदाधिकारी तसेच प्रदेश पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विस्तृत मार्गदर्शन केले व जबाबदारी नियोजन पार पडण्याचे आदेश दिले.यावेळी व्यासपीठावर माजी खासदार माजी मंत्री अनंतराव देशमुख
खा.अनुप धोत्रे ,भाजप जिल्हा अध्यक्ष शाम बढे,भाजप रिसोड मालेगाव विधानसभा निवडणुक प्रमुख ॲड नकुल देशमुख,माजी आमदार विजयराव जाधव,जिल्हा महामंत्री गजाननराव लाटे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य पदाधिकारी, रिसोड व मालेगाव मंडळ पदाधिकारी, रिसोड मालेगाव तालुका व शहर चे मोर्चा अध्यक्ष,विविध मोर्चाचे प्रदेश सदस्य, रिसोड व मालेगाव विधानसभे अंतर्गत येणारी स्थानिक स्वराज्य संस्थेचे आजी व माजी लोकप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रात प्रसिद्ध असलेली मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ll
Comments
Post a Comment