रिसोड मध्ये शहराअंतर्गत वाहन चालक सुसाट वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
रिसोड मध्ये शहराअंतर्गत वाहन चालक सुसाट वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष.
---------------------------------
रिसोड प्रतिनिधी,
रणजीत सिंह ठाकुर
---------------------------------
रिसोड ते मालेगाव रोडवर असलेल्या हायहवे वर व रिसोड शहरातील रस्तावर
अडथळा नसल्याने रस्त्यावर गतिरोधक अन्य कुठलेही अडथळे नसल्यामुळे वाहनचालक सुसाट धावत आहेत. त्यामुळे अपघाताबरोबरच बाचाबाची, हाणामारीचे प्रकार वाढले आहेत. वाहतुकीच्या नियंत्रणासाठी शहरात तीन ते चार ठिकाणी गतिरोधक असणे अत्यंत गरजेचे झाले आहे.अनेक पक्षाचे पदाधिकारी यांनी निवेदन देऊन सुध्या गतिरोधक झालेच नाही
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासह शहरांतर्गत बाजारपेठ, विविध कार्यालये, बँक,महाविद्यालय विद्यालय, कॉन्व्हेंट आदी परिसरात दिवसभर वाहनांची, नागरिकांची वर्दळ नचंड वाढली आहे. या रस्त्यांवरील चौक, नाके, कॉर्नर येथे सातत्याने वाहतुकीची कोंडी होताना दिसून येते. शहर वाहतूक शाखा दिवसाचे काही
तास या ठिकाणच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते; परंतु त्या व्यतिरिक्त सकाळ व सायंकाळच्या सुमारास या ठिकाणांवर अक्षरशः वाहनांची रेटारेटी होत असून चौकाच्या ठिकाणी तर प्रचंड गोंधळ निर्माण होतो.
शहरात सायंकाळी व रात्रीच्या सुमारास नशा करून वाहने त्यातही दुचाकी वाहने चालविणाऱ्यांची संख्या शाळा महाविद्यालय परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, लोणी फाटा, रिसोड नाका, हिंगोली नाका ,वाशिम नाका,,पंचायत समिती, छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि अकोलाबैक, चौकभारतीय स्टेट बँक, तहसील कार्यालय,बाजार समिती आदी ठिकाणी गतिरोधक कार्यान्वित करणे गरजेचे आहे. सकाळ व सायंकाळच्या सुमारास या ठिकाणांवर अक्षरशः वाहनांची गर्दी होत असून चौकाच्या ठिकाणी तर प्रचंड गोंधळ निर्माण होत असतो.वाढल्याचे चित्र आहे.विशेष यामध्ये तरुणाई गुरफटल्याचे चित्र आहे. वास्तविक पाहता यासाठीचा कायदा अतिशय कठोर असून नशा करून वाहन चालविल्यास १० हजार रुपये दंड किंवा सहा महिन्यांची शिक्षा किंवा दोन्ही अशी कायद्यात तरतूद आहे; परंतु संबंधित यंत्रणेकडून गांभीर्याने घेतले जात नसल्यामुळे, नियमित तपासण्या शहरासाठी सीसीटीव्ही अतिशय आवश्यक आहे.दोन्ही विषय ठेवले आहेत. यासाठी पत्र व्यवहार देखील केला गेला आहे.मात्र याकडे राष्टीय महामार्गचे अधिकारी दुर्लक्ष करीत असून या मागणीला महत्त्व दिले जात नाहीत्यामुळे होणाऱ्या अपघाताचा अनेकांना फटका बसत आहे; परंतु अनेक ठिकाणी तर नेमक्या कोणत्या मार्गाने जावे व यावे हे समजतच नसल्यामुळे अनेकवेळा वाहने एकमेकांसमोर येताना दिसून येतात. अनेकवेळा ही वाहने एकमेकांवर आदळण्याचे देखील प्रकार घडले आहेत. *बाॅकस तसेच रिसोड मालेगाव रोडचे सध्या काम चालू आहे त्याही मार्गावर जिथे गाव आहे किंवा फाटा आहे त्या ठिकाणी सुद्धा गतिरोधक बसविण्याची नितांत गरज आहे, या रस्त्यावर कुठेच गतिरोधक नसल्यामुळे वाहनधारक सुसाट वाहने चालवतात, त्यामुळे अपघाताची शक्यता न करता येत नाही, सुनीलभाऊ बेलोकार वाहनधारक रिसोड*
Comments
Post a Comment