निपाणी राधानगरी रोडवरील मांगेवाडी येथे भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू. तर चारजण गंभीर जखमी.

निपाणी राधानगरी रोडवरील मांगेवाडी येथे भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू. तर चारजण गंभीर जखमी.



------------------------------ 

राधानगरी प्रतिनिधी

विजय बकरे.

------------------------------ 

       निपाणी - फोंडा राज्य मार्गावर रात्री 12:30 वा. सरवडे तालुका राधानगरी गावच्या नदी पुलावरील पश्चिम बाजूच्या वळणावर गारगोटीहुन सोळंकुर या आपल्या गावी महिंद्रा कंपनीची बोलेरो गाडी नंबर MH42H3064 यातून रोहन संभाजी लोहार व त्याचे मित्र येत असताना राधानगरी कडून मुद्दाळ तिठ्ठा या मार्गाकडे जाणारा ट्रक नंबर KA28AA8206 या वाहनाने समोरून येणाऱ्या बोलोरो गाडीला जोराची धडक दिल्याने बोलेरो गाडीतील रोहन संभाजी लोहार, आकाश आनंदा परीट, शुभम चंद्रकांत धावरे राहणार सोळंंकुर हे तिनजण जागीच ठार झाले, तर ऋत्विक राजेंद्र पाटील, भरत तानाजी पाटील, सौरभ सुरेश तेली, संभाजी हनुमंत लोहार हे गंभीर जखमी आहेत, अज्ञात ट्रकचालक याने वाहन बेदरकारपणे व निष्काळजीपणे वाहन चालवल्याने मयत व जखमी सर्वांना कोणतीही मदत न करता व अपघाताचे गांभीर्य लक्षात येऊन सुद्धा तिथून तो पसार झाला.

      ट्रक नं KA28AA8206 ट्रकचालक विरुद्ध राधानगरी पोलीस ठाणे मध्ये फिर्यादी राजेंद्र मनोहर लोहार मु. पो. सोळांकुर ता. राधानगरी यांनी फिर्याद दिली आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेश घेरडीकर, अंमलदार अंबुलकर इ. करत आहेत.

 ऐन गणेशोत्सवात हा अपघात झाल्याने व करती सवरती मुले अचानक गेल्याने सोळंकुर गावावर व पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.