अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात तगडा पोलीस बंदोबस्त. अचलपूरच्या टीएमसी यार्डवर आ. नितेश राणे ची आज जाहीर सभा.

 अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात तगडा पोलीस बंदोबस्त. अचलपूरच्या टीएमसी यार्डवर आ. नितेश राणे ची आज जाहीर सभा.

------------------------------------------

अमरावती जिल्हा प्रतिनिधी

 पी.एन देशमुख.

------------------------------------------

अमरावती. (अचलपूर)

अचलपूर परतवाडा शहरात हिंदू जल आक्रोश मोर्चा, बाईक रॅली व भाजप आमदार नितेश राणे यांच्या सभेचे अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील टीएमसी यार्डवर रविवार दीड.२९ आयोजन केले राणे यांनी अहमदनगर येथे केलेल्या भाषणामुळे जुळ्या शहरात जातीय तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था विस्कळीत होऊ नये यासाठी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर व परतवाडा शहरात १२०० पेक्षा अधिक पोलिसांचा पाऊस पाटा तयार केला आहे. शहरातील एका संघटनेने आ. नितेश राणे यांच्या आगमनाला विरोध दर्शविला. तसेच जुळ्या शहरातील शांतता अबाधित राहावे म्हणून काही संघटना व एकापेक्षाच्या वतीने प्रशासनाला निवेदन देऊन जातीय तेढ निर्माण करणारे कार्यक्रम आयोजित करू नये, अशी मागणी केल्याने अचलपूर परतवाडा शहरासह ग्रामीण भागात कोणतीही अनुसूचित घटना घडवू नये म्हणून पोलीस अधीक्षकांनी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. अमरावती जिल्ह्याबाहेरील पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तळ ठोकून आहेत. जुळ्या शहरात पोलीस  बंदोबस्त. कायदा मोडणाऱ्या वर कडक कारवाई होईल. शहरात २९ सप्टेंबरला होणारी आक्रोश सभा व रॅली पाहता पोलिसांचा कडक बंदोबस्त केला आहे. कायदा मोडणाऱ्यांची गया केली जाणार नाही. पोलीस प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवून आहेत. त्याचप्रमाणे सोशल मीडिया व इतर माध्यमातून निर्माण होईल, असे अक्षेपार्य मेसेज, पोस्ट, व्हिडिओ व्हायरल केल्यास कायदेशीर कारवाई केल्या जाईल. शहरात शांतता आहे. कुठल्याही संस्था हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती कायदा मोडणाऱ्या वर कडक  कारवाई केली जाईल. असे पंकज कुमावत अप्पर पोलीस अधीक्षक यांनी आमच्या प्रतिनिधींना माहिती दिली.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.