महावितरणचे मुख्य अभियंता यांची आज(दि.०६) आकाशवाणी कोल्हापूरवर मुलाखत.

 महावितरणचे मुख्य अभियंता यांची आज(दि.०६) आकाशवाणी कोल्हापूरवर मुलाखत.

सार्वजनिक उत्सवात विजेबाबत घ्यावयाची काळजी याबाबत करणार मार्गदर्शन.

*कोल्हापूर, दि. ०५सप्टेंबर २०२४ :* महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणेशाचा उत्सव आनंददायी व निर्विघ्न पार पाडावा यासाठी नागरिकांनी तसेच सार्वजनिक उत्सव मंडळांनी वीज सुरक्षेबाबत उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यानुसार उत्सव काळात नागरिकांनी तसेच गणेश मंडळांनी विजेबाबत घ्यावयाची काळजी या अनुषंगाने महावितरणच्या कोल्हापूर परिमंडल, कोल्हापूरचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांची आज (दि.०६) आकाशवाणी कोल्हापूर (१०२.७ मे.ह.) वरून सकाळी ११.००० वाजता मुलाखत प्रसारित होणार आहे. आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी प्रवीण  चिपळूणकर यांनी ही मुलाखत घेतली आहे. 


  आपल्या सर्वांचा गणेश उत्सव निर्विघ्न पार पाडवा याकरता या मुलाखतीत देण्यात येणारी माहिती सर्व नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. नागरिकांनी ही मुलाखत आवर्जून ऐकावी व या माहितीचा उपयोग करून गणेश उत्सव सुरक्षित साजरा करावा असे आवाहन महावितरण करत आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.