नेज शिवपुरी येथे निवडणुकीच्या सर्वेसाठी आलेल्या अनोळखी महिलांना नेज ग्रामस्थांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात.

नेज शिवपुरी येथे निवडणुकीच्या सर्वेसाठी आलेल्या अनोळखी महिलांना नेज ग्रामस्थांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात.

-----------------------------

 कुंभोज प्रतिनिधी 

विनोद शिंगे 

-----------------------------

नेज शिवपुरी तालुका हातकलंगले येथेआगामी विधानसभा निवडणुकीच्या नावाखाली गावात सर्वे करत असताना ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी चार महिला व दोन पुरुषांना आज रंगेहात पकडले यावेळी त्यांनी आपण निवडणुकीच्या सर्वेसाठी आले असल्याची माहिती दिली. परंतु सदर महिला उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश परिसरातील असून त्यांच्याकडे कोणत्याही पद्धतीचे सदर सर्वेचे कागदपत्रे नसल्याने नेज पोलीस पाटील पांडुरंग कुंभार यांनी ग्रामस्थांचा रोष पाहता सर्व महिलांना चार चाकीतून हातकणंगले पोलीस स्टेशन येथे हजर केले. यावेळी हातकणले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी सर्व कागदपत्रांची तपासणी करून पुढील तपासासाठी त्यांना कोल्हापूर जिल्हा पोलीस मुख्यालयात हजर करण्याच्या सूचना दिल्या ,यावेळी नेज ग्रामस्थांनी दाखवलेली एकी व व चोरी होऊ नये यासाठी केलेले प्रयत्न याचे हातकणंगले पोलिसांच्या वतीने कौतुक करण्यात आले. परिणामी अशा पद्धतीच्या कोणत्याही महिलांना आपल्या गावात ग्रामपंचायत अथवा पोलिसांच्या परवानगी शिवाय सर्वे करू नये असे आव्हान हातकणंगले पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. प्रतिनिधी विनोद शिंगे कुंभोज

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.