किसन वीर महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी.
किसन वीर महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी.
---------------------------------------
वाई प्रतिनिधी
कमलेश ढेकाणे
---------------------------------------
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील स्टाफ वेल्फेअर समितीच्या वतीने पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालय विकास समिती सदस्य व इंग्रजी विभागप्रमुख प्रो. डॉ. सुनील सावंत यांच्या शुभहस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी स्टाफ सेक्रेटरी डॉ. अंबादास सकट, श्री. जयवंत खोत, श्री. सोमनाथ सानप, श्री. सुनील जंगम, श्री. वासुदेव वासोळकर यांची विशेष उपस्थिती होती.
कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्रातील थोर समाजसेवक, शिक्षणतज्ञ व विचारवंत होते. त्यांनी १९१९ मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. सर्वसामान्य कुटुंबातील मुला मुलींना महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे यासाठी 'कमवा व शिका' ही योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून अनेक गुणवंत, स्वावलंबी व स्वाभिमानी विद्यार्थी घडवले. त्यांनी स्वतः अनवाणी पायांनी फिरून अनेक दानशूर व्यक्तींच्या सहाय्याने शाळा व महाविद्यालये उभारून शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव व अविस्मरणीय असे कार्य केले. कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्रातील शिक्षण व श्रमप्रतिष्ठेला महत्त्व देणारे महान व्यक्तिमत्त्व होते असे उद्गार प्रो. डॉ. सुनील सावंत यांनी काढले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अंबादास सकट यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री. जयवंत खोत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या विद्यार्थिनी कु. प्रेरणा सकट, कु. नेहा संकपाळ, कु. तनिष्का शिंदे, कु. गौरी गायकवाड आदींनी विशेष परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment