भर पावसात ठाम मांडून आदिवासींचा ठिय्या आंदोलन सुरूच कुसूंबी चुनखड्डी उत्खनन ठप्प.
भर पावसात ठाम मांडून आदिवासींचा ठिय्या आंदोलन सुरूच कुसूंबी चुनखड्डी उत्खनन ठप्प.
-------------------------------
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मंगेश तिखट
---------------------------------
माणिकगड गडचांदूर स्थितअल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या कुसुंबी माईन्सच्या आदिवासी कोलामांच्या शेतजमिनी भूपृष्ठ अधिकार किंवा भूसंपादन प्रक्रिया न करता अल्ट्राटेक सिमेंट कंपनीने बेकायदेशीर आपल्या हितासाठीआदिवासींच्या ताब्यात घेतल्याने संतप्त होऊन आदिवासींनी कुटुंबासह कालपासून कोलाम व आदिवासी समूह आपल्या हक्काच्या जमिनीचा ताबा घ्या आदिवासी कोलामांना नोकरी द्या याकरिता या आंदोलन सुरू केले आहे रात्र पडलेल्या धो धो पावसात 18 कुटुंब आपल्या परिवारासह ताडपत्रीत रात्र काढली पोलीस व महसूल प्रशासनाकडून आंदोलन थांबवण्याचा आग्रह करण्यात आला मात्र प्रशासनाकडून आम्हाला गेल्या दहा वर्षापासून हुलकावणी दिल्या जात असून आदिवासींचे शोषण खुलेआम कंपनी करीत आहे आदिवासीवर संविधानिक मार्गाने आंदोलन करत असताना आठ ते दहा गुन्हे दाखल करून संपूर्ण गरीब कुटुंबांना ब्रिटिश धरण्यात आले आहे कंपनीचे अन्यायाबाबत शेकडो तक्रारी गंभीर तक्रारी अल्ट्राटेक सिमेंट व्यवस्थापन विरोधात दिले असताना मात्र यांच्यावर पोलीस प्रशासन किंवा महसूल प्रशासन कारवाई करण्यासाठी पुढे सरसावत नाही मात्र आदिवासीचा एवढा छळ कंपनी करीत असताना सुद्धा कंपनीवर कारवाई का केला जात नाही कंपनीने कायदेशीर कोणत्याही प्रक्रिया पार न पाडता 18 आदिवासी कोलामाच्या शेतजमिनी नष्ट करून चुनखडी उत्खनन केले आहे मंदिरात जाण्यासाठी मजा केल्या जाते रस्ता बंद पाडून सीमा चेंज केले आहे गावालगत असलेले हायमॅक्स लाईट बंद पाडण्यात आले पाट्या गुड्याचे पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन बंद करण्यात आली चार दशकापासून जमिनी घेऊन सुद्धा आदिवासी कोलाम कुटुंबांना नोकरीचा अधिकार दिला नाही यामुळे या प्रकल्प बाधीताच्या दोन पिढ्या बरबाद झालेले आहेकंपनीला शासनाने टप्प्याटप्प्याने 643 हेक्टर जमिनीची लीज करारकेला असला तरी मात्र कंपनीने लीच करारात दिलेल्या जमिनीची भूमापन मोजणी केलेली नाही त्यामुळे महसूल वनविभाग व खाजगी जमिनी बळकावून हजारो हेक्टर क्षेत्रातून चुनखडीचे उत्खनन करून राष्ट्रीय संपत्तीची हानी व शासनाचे कराची चोरी कंपनीने केलेली आहे याकरिता चार मागण्या घेऊन कंपनी विरोधात आंदोलन सुरू आहे जमिनीची संपूर्ण भूमापन मोजणी करण्यात यावी जमिनीचा बाजारभावाने योग्य मोबदला देण्यात यावा कोलाम व आदिवासी कुटुंबांना नोकरी देण्यात यावी या मागण्या घेऊन आंदोलन करते ठाम असून कालपासून कंपनीने खदानी वरील चुनखडी उत्खनन बंद केले आहे या परिसरात वाहतूक देखील बंद झाल्याने आदिवासींमध्ये अन्यायाबाबत मोठ्या प्रमाणात चीड निर्माण झालेली आहे यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे सहसचिव आबिद अली यांनी प्रशासनाने आदिवासी च्या अन्यायाची गंभीर दखल घेऊन समस्या सोडवावी आंदोलन चिघडण्या पूर्वी मार्ग काढावा असे मत व्यक्त केली यावेळीभाऊराव कन्नाकेसुनील पेंदोर रामकिसन आत्राम महादेव कुलमेथे केशव कुळुमाते यांचे सह शेकडो महिला पुरुष आंदोलनाला सहभागी आहेत
Comments
Post a Comment