मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्रातील साहित्याचा शुक्रवारी जाहीर लिलाव.
मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्रातील साहित्याचा शुक्रवारी जाहीर लिलाव.
कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : कोल्हापूर येथील मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्रातील प्रक्षेत्रावरील उपलब्ध 2 हजार 515 रिकाम्या कुक्कुट खाद्यांच्या गोण्यांचा, विद्युत साहित्य (जनेरेटर, hatcher, setter व इतर) तसेच लाकडी व लोखंडी साहित्याचा जाहीर लिलाव शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित केला असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा लिलाव समितीचे अध्यक्ष डॉ. ए.एस.इंगळे यांनी केले आहे.
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कोल्हापूर तसेच मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, कोल्हापूर या कार्यालयाच्या सूचना फलकावर लिलावाच्या अटी, शर्ती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. गोणी, विद्युत साहित्य तसेच लाकडी व लोखंडी साहित्य पहाणी करण्यासाठी इच्छुकांनी प्रक्षेत्र व्यवस्थापनाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. लिलावा वेळी इच्छुकांनी अनामत रक्कम 500 रु. प्रति लिलाव सह उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी-0231-2651729 वर संपर्क साधावा, असेही डॉ. इंगळे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
***
Comments
Post a Comment