मानसिंग खोराटे एकमेव आश्वासक चेहरा कवळीकट्टीग्रामस्थांचा विधानसभेला पाठींबा.
मानसिंग खोराटे एकमेव आश्वासक चेहरा कवळीकट्टीग्रामस्थांचा विधानसभेला पाठींबा.
-----------------------
चंदगड प्रतिनिधी
आशिष पाटील
-----------------------
आगामी विधानसभा निवडणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असून प्रत्येकजण तयारीला लागला आहे. मात्र, त्यामध्ये मतदारसंघामध्ये एक आश्वासक चेहरा म्हणून अथर्व - दौलतचे चेअरमन मानसिंग खोराटे हे समोर येत आहेत. त्यांना मतदारसंघातून विविध स्थरातून पाठींबा वाढत आहे. त्यामध्ये गडहिंग्लज विभागातून तर प्रचंद प्रतिसाद मिळत असून विकासाच्या मुद्यावर अनेकजण खोराटे यांना साथ देत आहेत. त्यामध्ये गडहिंग्लज तालुक्यातील कवळीकट्टी गावाने देरिल खोराटे यांना आपला जाहीर पार्ठीबा दर्शवला असून विधानसभेत आपले प्रतिनिधीत्व करण्याची संधी देण्याचा निर्धार केला आहे.
चंदगड : कवळीकट्टी (ता. गडहिग्लज) ग्रमस्थांनी दौलत कारखाना स्थळावर चेअरमन मानसिंग खोराटे यांची भेट घेवून त्यांना पाठींबा जाहीर केला चंदगड मतदार संघातील कळवीकट्टे (ता.
गडहिंग्लज ) ग्रामस्थांनी खोराटेंची कारखाना
कार्यस्थळावर भेट घेतली. यावेळी रोजगार, उद्योग, शेतकरी, महिलांचे प्रश्न प्रामुख्याने हाताळण्याचे आश्वासन खोराटे यांनी दिले. त्यांच्या मतदारसंघासाठी असलेल्या विकासाच्या कल्पना, त्यातील सामाजिक बांधिलकी राखत करण्यात येणारे काम आणि त्यांची तळमळ पाहता आगामी विधानसभेसाठी आपण सर्व ग्रामस्थ खोराटेंच्या पाठींबा असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी माजी सरपंच शिवाजी बंडू पाटील, माजी सदस्य बी.आर. पाटील, महादेव रामा अस्वले, प्रकाश जीवबा पाटील, प्रशांत पिराजी चव्हाण विड्ठल नागोजी पाटील, देवाप्पा आप्पांना खराटे, महादेव संतु पाटील, प्रदीप पाटील, संजय पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment