प्रहार त्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतीप्रश्न, प्रहार वर सडेतोड प्रतिउत्तर, आम्ही काय खुरपायला जायच ?

 प्रहार त्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतीप्रश्न, प्रहार वर सडेतोड प्रतिउत्तर, आम्ही काय खुरपायला जायच ?

-----------------------------------------

 अमरावती जिल्हा प्रतिनिधी.

पी.एन.देशमुख.

-----------------------------------------

अमरावती.

दिव्यांग बांधवांच्या विविध प्रश्नावर जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वाट अडवत मागण्याचे निवेदन दिले. निवेदन देऊन त्यांना राजकीय आरक्षण द्या, अशी मागणी देखील करण्यात आली होती. यावर तुम्हाला आरक्षण देऊन आम्ही काय खुरपायला जायचे काय असे प्रति प्रश्न अजित पवारांनी आंदोलकांना केला. त्यांच्या या उत्तरावर प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विविध विकास कामाच्या भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमासाठी ते अमरावतीत आले होते. प्रहार संघटनेने दिवंगाच्या प्रश्नासंदर्भात मागण्याचे निवेदन त्यांना अजित पवार यांनी दिवंग्याच्या सर्व प्रश्न संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत तात्काळ योग्य ते निर्णय घेण्याचे निर्देश दिले जनतेचा जर तुम्हाला पाठिंबा असेल   तर, तुम्ही सुद्धा निवडणुकीत उभे राहू शकता, असा सल्ला देण्यासही ते विसरले नाही. आम्ही दिव्यागाच्या प्रश्नावर अजित पवार यांना निवेदन दिले. परंतु दिव्यागाच्या राजकीय आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांच्याकडून अशा उत्तराची अपेक्षा नव्हती. त्यामुळे आम्ही निषेध नोंदवतो असे महानगर प्रहार जनशक्ती पक्षाचे बंटी रामटेके यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.