विनाअनुदानित शिक्षक उद्या आत्मदहन करणारचआंदोलनाचा ५५ वा दिवस : शिक्षक आक्रमक.
विनाअनुदानित शिक्षक उद्या आत्मदहन करणारचआंदोलनाचा ५५ वा दिवस : शिक्षक आक्रमक.
आत्मदहनाची दखल घेत लोकप्रिय खासदार धैर्यशील माने यांनी मुंबईत मा शिक्षणमंत्री दिपकजी केसरकर यांची भेट घेतली
राधानगरी /अरविंद पाटील - सोमवारच्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत सरकारने वाढीव टप्प्याच्या विषयाला बगल दिल्याने विनाअनुदानित शिक्षकांनी बुधवारी (ता. २५) आत्मदहनाचा इशारा दिला आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आत्मदहन केले जाणार आहे. आंदोलनाचा आज ५५ वा दिवस होता. राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील हजारो शिक्षक वाढीव टप्प्याचा जीआर व विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत.
यावेळी आत्मदहनाची दखल घेत लोकप्रिय खासदार धैर्यशील माने यांनी मुंबईत मा शिक्षणमंत्री दिपकजी केसरकर यांची त्यांच्या दालनात भेट घेतली व कोल्हापूर येथे सुरू असलेल्या आंदोलनाबाबत चर्चा केली गेली 55 दिवस रस्त्यावर आहेत सोमवारच्या कॅबिनेटमध्ये सरकारने वाढीव टप्प्याबाबत कोणताच विषय घेतला नाही. हा प्रश्न सुटला पाहिजे गेली *अनेक दिवस हजारो शिक्षक रस्त्यावर आहेत,* याबाबत आपण निश्चिंत असा निर्णय घ्यावा कारण यामुळे शासनाबद्दल असंतोष निर्माण होत आहे.....
त्यावेळी मा. शिक्षणमंत्री महोदयांनी सांगितले ली वित्त विभागाकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही, होय किंवा नाही अस काहीच आलं नाही त्यामुळे *मी स्वतः ही फाइल घेऊन जाणार आहे व येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय घेणार आहे..*
त्यावेळी मंत्री महोदयांच्या दालनातून मा. खासदार धैर्यशील माने साहेब यांनी . खंडेराव जगदाळे सर यांना फोन लावला व सर्व वृत्तांत सांगितला व *आत्मदहन करू नये काही दिवसात हा निर्णय होईल तरी यापासून परावृत्त व्हावे ही विनंती केली.....
*सरकारला याआधी शिक्षकांनी मंगळवारपर्यंत (ता. २४) अल्टिमेटम दिला आहे. वाढीव टप्प्याचा आदेश निघाला नाही तर बुधवारी आत्मदहन केले जाईल, असा इशारा दिला आहे.
चौकट - "तर सरकार जबाबदार"
सभागृहात 12 जुलैला वाढीव टप्प्याची घोषणा झालेली आहे. अद्यापही त्याचा जीआर नाही. वेळकाढूपणा आणि वारंवार रद्द होणाऱ्या कॅबिनेट व त्यामध्ये न न येणारा विषयाबाबत सर्व शिक्षकांची घोर निराशा झाली आहे. कालच्या कॅबिनेटमध्ये सरकारने वाढीव टप्प्याबाबत कोणताच विषय न घेतल्यामुळे आम्हा शिक्षकांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे सर्व शिक्षक संतप्त झाले आहेत. आम्ही बुधवारी आत्मदहन करणारच असून याची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची राहील.
खंडेराव जगदाळे, उपाध्यक्ष
या वेळी शिवाजी कुरणे, केदारी मगदूम, संग्राम कांबळे वैद्यनाथ चाटे सरदार अजेटराव मुरलीधर कवाडकर शीतल जाधव मच्छिद्र जाधव राजू भोरे मुक्ता मोटे गौतमी पाटील भाग्यश्री राणे नेहा भुसारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment