ढकलगाडी लावण्याच्या वादात झाला आराम कॉर्नर येथे खून.

 ढकलगाडी लावण्याच्या वादात झाला आराम कॉर्नर येथे खून.

कोल्हापुरातील शिवाजी रोडवरील आराम कॉर्नर येथे मुजावर कुटूंबियांसह राहत असून त्यांचा रस्त्यावर ढकलगाडा लावून कटलरी साहित्य विक्रीचा  व्यवसाय आहे. या कुटूंबातील इम्रान मुजावरसह त्याचे आई, वडील आणि बहीण शिवाजी रोडवर हा व्यवसाय करतात. याच परिसरातील आराम कॉर्नर इथं राहणारा

युसूफ अलमजिदही पत्नीसोबत याच ठिकाणी ढकल गाडीवर व्यवसाय करतो. १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास युसूफ अलमजिद हा आराम कॉर्नर इथ गेला होता. तिथं त्यानं इमरान मुजावरच्या आई वडील आणि बहिणीला माझ्या पत्नीच्या जागेवर गाडी का लावली असा जाब विचारत त्यांना शिवीगाळ केली. याबाबत इमरान मुजावर याला माहिती मिळाली. त्यानं युसुफ अलमजीदला फोन करून आई, वडील आणि बहिणीला शिवीगाळ केल्याबाबत जाब विचारला. त्याचा राग मनात ठेवून १६ सप्टेंबर रोजी युसुफ अलमजीद हा हत्यार घेऊन इमरान मुजावर याचा शोध घेत होता. याबाबत इमरानचा भाऊजी समीर शेख याला दोघा, तिघांनी माहिती दिली होती. सायंकाळी इम्रान मुजावर हा मोबाईलवर बोलत आराम कॉर्नर इथल्या  टीव्ही दुकानाच्या दारातील पायऱ्यांवर बसला असताना त्याच वेळी युसुफ अलमजीद हा तिथं आला. तो इमरानच्या अंगावर जाणार इतक्यात त्याच गल्लीतील दोघा तरुणांनी त्याला अडवल. मात्र बाजूला व्हा नाहीतर तुम्हालाही भोसकून टाकीन असा दम भरल्यान घाबरून ते दोघेजण बाजूला झाले. त्याचवेळी युसूफने थेट इम्रानवर हल्ला केला. युसूफने इमरानच्या डाव्या बरगडी खाली चाकून भोसकल्यानं काही क्षणातच इमरान रस्त्यावर कोसळला. अशातच इम्रानच्या डाव्या हातावर देखील युसूफनं वार केला. यादरम्यान मज्जित जवळ उभारलेले इमरानचे भाऊजी समीर शेख आणि त्याचे काही सहकारी धावतच घटनास्थळी आले दरम्यान युसूफनं आपल्याला भोकसल्याचं इम्राननं सांगितलं. ताबडतोब सर्वांनी इमरानला उचलून समीर शेखच्या रिक्षात घातलं. अवघ्या काही मिनिटातच इमरानला सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केलं. मात्र फुफुसाला होल पडल्यान उपचारादरम्यानच इमरान मुजावरचा मृत्यू झाला. त्यामुळ त्याच्या नातेवाईकांनी  आक्रोश केला. अगदी शुल्लक कारणावरून इसुफनं रागाच्या भरात इमरानवर केलेल्या हाल्यामूळे इम्रानला जीवाला मुकावं लागलं. दरम्यान हल्लेखोर युसुफला स्थानिक तरुण आणि पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याला जुना राजवाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल. रात्री उशिरा त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आलीय. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रीतम कुमार पुजारी करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.