Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

द युवा ग्रामीण पत्रकार संघ कोल्हापूर जिल्हा या संघटनेची कोल्हापुरात स्थापना.

 द युवा ग्रामीण पत्रकार संघ कोल्हापूर जिल्हा या संघटनेची कोल्हापुरात स्थापना.

----------------------------------- 

कौलव प्रतिनिधी

संदीप कलिकते

----------------------------------- 

प्रसार माध्यमे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विविध प्रकारचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक,औद्योगिक व क्रीडा विषयक माहिती समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम पत्रकार बंधू करत असतात परंतु पत्रकारांनी स्वतःच्या न्याय व हक्कासाठी व समाजासाठी एकत्र राहणे गरजेचे आहे हा उदात्त हेतू ठेवून 

द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य, कोल्हापूर जिल्हा या पत्रकार संघटनेची कोल्हापूरात सुरुवात संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सागर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कार्यक्रमाला दत्तात्रय पाटील, उपाध्यक्ष पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य हे प्रमुख पाहुणे होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष सागर शेळके तसेच राजेंद्र सूर्यवंशी जिल्हा उपाध्यक्ष, सचिन गवळी जिल्हा कोषाध्यक्ष तसेच सर्व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी द ग्रामीण युवा पत्रकार संघ कोल्हापूर जिल्हा या या संघटनेची सुरुवात करण्यात आली. यावेळी सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र व ओळखपत्र वाटप करण्यात आले यावेळी प्राध्यापक डॉ. बाबुराव घुरके यांनी या संघटनेचे ध्येय व धोरणे विशद केली. जिल्हाध्यक्ष सागर शेळके यांनी सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी  सर्व पत्रकारांचे अभिनंदन करून सर्वांनी घटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य जोमान करावे व लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले यावेळी राजेंद्र सूर्यवंशी यांनी पत्रकारांना  मार्गदर्शन केले. पत्रकार गोरख कांबळे, नारायण लोहार यांनी सर्वांना संघटित राहण्याचे आवाहन केले.


यावेळी आग्नेल चव्हाण , संदीप कलिकते, रोहन भिऊंगडे , विजय मोरबाळे, गोरख कांबळे,संजय पाटील,राजेंद्र सुर्यवंशी ,कैयुम शेख, सुभाष गुरव, शौकत मानगावे,बाजीराव पाटील,इक़बाल सनदी,रणजीत पाटील,नारायण लोहार,ईश्वरा गायकवाड़,संभाजी चौगुले,सचिन गवळी,अजिंक्य कावनेकर,शीतल कांबळे, कुलदीप कुंभार,दीपक पाटील, संदीप इंगळे इत्यादी पदधिकारी उपस्थित होते

या कार्यक्रमाचे आभार डॉ. बाबुराव घुरके, सूत्रसंचालन सुभाष भोसले यांनी केले.

Post a Comment

0 Comments