सोनखेड पोलिसांची जुगार अड्यावर धाड.
सोनखेड पोलिसांची जुगार अड्यावर धाड.
------------------------------------
लोहा प्रतिनिधि
अंबादास पवार
------------------------------------
तालुक्यातील सोनखेड ते शेवडी (बा) रस्त्यालगत विना परवाना व बेकायदेशीर रित्या मिलन नावाचा मटका जुगार कांहीं जण खेळताना सोनखेड पोलिसांनी सदर जुगार अड्यावर धाड टाकून रोख रक्कमेसह मुद्देमाल जप्त केला.
सोनखेड पोलिस ठाणे हद्दीतील सोनखेड ते शेवडी (बा) रस्त्या लगत सार्वजनिक ठिकाणी विना परवाना व बेकायदेशीर रित्या मिलन नावाचा मटका जुगार कांहीं आरोपी खेळताना व खेळविताना पोलिसांना मिळून आले. आरोपीकडून जुगाराचे साहित्य, ३ हजार ३८० रुपये रोख व १० हजार रुपये किमतीचा भ्रमणध्वनी असा एकूण १३ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध सपोउपनि गणपत नागोराव गीते यांच्या फिर्यादीवरून सोनखेड पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला. असून पुढील तपास गीते करत आहेत.
Comments
Post a Comment