अल्पवयीन मुलीवर अत्याचार दोघांविरुध्द गुन्हा दाखल.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार दोघांविरुध्द गुन्हा दाखल.
---------------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
शशिकांत कुंभार.
---------------------------------------
गांधीनगर, ता.७ः अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी शहानूर मलीकचंद दोडमनी (वय २३ वर्षे, सध्या रा. विक्रमनगर, नुरानी मस्जिदजवळ, कोल्हापूर, मूळ रा. अनगोळ, बेलहंगल, जि. बेळगांव, कर्नाटक) आणि सतिश तुकाराम रेवडे (वय २८, रा. व्हन्नूर, ता. कागल) यांच्याविरोधात गांधीनगर पोलीसांत गु्न्हा दाखल झाला.
याबाबतची माहिती अशी की, फिर्यादीत महिलेची अल्पवयीन मुलगी तीन दिवसांपूर्वी औषधे आणण्यासाठी मेडिकलला जातो असे सांगून गेली होती. त्यानंतर काल दुपारी एका ठिकाणी ही मुलगी नशेमध्ये आढळून आली. त्यानंतर तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तिने सांगितले की, आठ दिवसांपूर्वी संशयित आरोपींनी तिच्या राहत्या घरी तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले होते. याबाबत मुलीच्या आईने गांधीनगर पोलीसांत फिर्याद दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक जाधव करत आहेत.
--------------------
Comments
Post a Comment